BSNL युजर्ससाठी फेस्टिव सीजनमध्ये बंपर ऑफर्स, ‘या’ रिचार्जवर मोठे फायदे

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – बीएसएनएल कंपनीने ( BSNL) फेस्टिवल सीजनमध्ये (festive Offer) ग्राहकांना बंपर ऑफर देत आहे. बीएसएनएल मध्ये अनेक प्रिपेड व्हाऊचर्स (PVs) आणि स्पेशल टॅरिफ व्हाउचर्स (STVs) वरची वैधता वाढवली आहे. त्यामुळे युजर्सला मोठ्या वेळासाठी रिचार्जवर मिळणा-या सुविधेचा लाभ घेता येवू शकणार आहे. बीएसएनएलने 1999 , 699, 247,147 रुपयांच्या प्रीपेड व्हाउचर्स आणि स्पेशल टॅरिफ व्हाउचर्सवरची वैधता वाढवली आहे.17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत बीएसएनएलच्या प्रीपेड आणि टॅरिफ रिचार्ज प्लानचा फायदा घेता येवू शकतो.

कोणत्या रिचार्जवर किती फायदा
ग्राहक आता 30 नोव्हेंबर पर्यंत बीएसएनएलचा1999 रुपयांचा प्रीपेड प्लान घेत असतील तर त्यांना 365 दिवसांऐवजी आता 424 दिवसांची वैधता मिळू शकेल. म्हणजेच दोन महिने अतिरिक्त. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड व्हाइस कॉल सोबत 3 जीबी दररोज इंटरनेट मिळणार आहे. तसेच यासोबत अन्य अनेक लाभ युजर्संना मिळू शकणार आहे. ज्यात 2 महिन्याचा इरोस नाउ सब्सक्रिप्शन आणि बीएसएनएल ट्यून्स आहे.

699 आणि 247 च्या रिचार्जवर हे लाभ
बीएसएनएलच्या प्रोमोशनल ऑफर अंतर्गत तुम्हाला 699 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज केल्यास तुम्हाला 160 दिवसांच्या ऐवजी 180 दिवसांची वैधता मिळते. यात रोज 0.5 जीबी डेटा सोबत रोज 100 एसएमएस आणि 60 दिवसांसाठी फ्री बीएसएनएल ट्यून्सचा लाभ मिळणार आहे. 247 रुपयांच्या रिचार्जवर आता बीएसएनएल युजरला 30 दिवसांच्या ऐवजी 40 दिवसांची वैधता मिळणार आहे. तसेच अनलिमिटेड व्हाइस कॉल सोबत इंटरनेट युज करण्यासाठी रोज 3 जीबी डेटा मिळणार आहे. यासोबत रोज 100 एसएमएस आणि एक महिन्यांसाठी एरोस नाउ चे सब्सक्रिप्शन फ्री मिळणार आहे.

147 रुपयांच्या रिचार्जवर हे फायदे
बीएसएनएलच्या प्रोमोशनल ऑफर दरम्यान जर तुम्ही 147 रुपयांचे रिचार्ज करीत असाल तर तुम्हाला 35 दिवसाची वैधता मिळणार आहे. यात 10 जीबी डेटा आणि 30 दिवसांसाठी बीएसएनएल ट्यून्सची सुविधा फ्री मिळणार आहे. तसेच बीएसएनएलने 60 रुपयांच्या टॉपअपवर फुल टॉकटाइमची घोषणा केली आहे.