खुशखबर ! जिओ फोन 1 होणार आणखी ‘स्वस्त’, मिळणार अनेक नवीन ‘फीचर्स’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तु्म्ही जिओ फोन घेणार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जिओ फोन 1 आता स्वस्त होणार आहे. विशेष म्हणजे यात अनेक फीचर्स अ‍ॅड होणार आहेत. तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, सब्सक्रायबर्स वाढवण्यासाठी जिओ फोनची किंमत कमी करत आहे.

ग्राहकांनी जिओ फोन 2 ला म्हणावा तसा प्रतिसाद न दिल्यानें कंपनीने पु्न्हा एकदा जिओ फोन 1 वरच लक्ष केंद्रीत केल्याचं दिसत आहे. कपंनीचं ध्येय आहे की, जिओचे सब्सक्रायबर्स 50 कोटींपर्यंत जावेत. त्यामुळे या फोनची किंमतही कमी करण्यात आली आहे. ग्राहकांना आणखी एक फायदा असा होणार आहे की, किंमत तर कमी होतच आहे सोबत त्यांना काही फिचर्सही या फोनमध्ये मिळणार आहेत. असे म्हटले जात आहे की, जिओ फोन 2 च्या जास्त किंमतीमुळे त्याचा खप जास्त झाला नाही. त्यामुळे आता जिओ फोन 1 ची किंमत कमी केली जाणार आहे. या फोनमध्ये इंग्रजी विषयक, मनोरंजन तसेच, शेतीविषयक अ‍ॅप दिले जाण्याची शक्यता आहे.

जिओ फोन लाँच झाला तेव्हा सुरुवातीच्या काळात कंपनीला खूप नफा झाला. कारण यामध्ये 49 रुपयांपासून नेट पॅक उपलब्ध होते. याशिवाय याची किंमतही 1500 रुपये इतकी होती. काही काळानंतर कंपनीचे शेअर्स 28 टक्क्यांनी घरसल्याचे समोर आले. यानंतर आता नफा वाढवण्यासाठी कंपनीने पुन्हा एकदा जिओ फोन 1 वर फोकस केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –