‘या’ मोबाईल गेमचा सर्वांना ‘नाद’, कंपनीने कमवलं ७०० मिलियन डॉलर्सच घबाड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या मोबाईल गेमिंगमध्ये पबजी हा गेम सर्वाधिक लोकप्रिय आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, लोकप्रियतेव्यतिरीक्त पबजीने आता कमाईच्या बाबतीतही बाजी मारल्याचे दिसत आहे. इतर कोणत्याही मोबाईल गेमपेक्षा पबजीने सर्वाधिक कमाई केल्याचे समजत आहे. या गेमच्या डाऊनलोड्सबद्दल सांगायचे झाले तर, ४० कोटींपेक्षा अधिक युजर्सने हा गेम डाऊनलोड केला आहे. चीन देश सोडला तर इतर देशांमध्ये दररोज ५ कोटींहून अधिक अ‍ॅक्टीव्ह युजर्स आहेत जे रोज पबजी खेळतात. समोर आलेल्या एका रिपोर्ट्सनुसार, गेल्याच महिन्यात पबजीने १४६ मिलियन डॉलर्स कमावले आहेत. हे झालं फक्त एका महिन्याच्या कमाईचं. पूर्ण वर्षाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, मागील वर्षी पबजीने ७०० मिलियन डॉलर्स कमावले आहेत.

अनेक मोबाईल गेम असे आहेत जे इन-गेम-पर्चेस असतात. तुम्हाला सांगू इच्छितो की, इन-गेम लुक जबरदस्त ठेवण्यासाठी पबजी खूपच काळजी घेताना दिसत आहे. गेममध्ये वापरल्या गेलेल्या स्कीन आणि वेशभुषेसाठी पबजीने बराच खर्च केलेला दिसत आहे. गेममध्ये युजर्सना नेहमीच काहीना काही नवीन हवे असते. जर युजर्सना गेममध्ये नाविन्य मिळाले तरच युजर्स टिकून राहतात किंवा ते नवीन पर्याय शोधतात. आपला युजर टिकून राहावा यासाठी पबजीने अनेक अपडेट आणले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, पबजी आता स्नो थीम मॅप आणण्याच्या तयारीत आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, २२ जून रोजी पबजी गेमचा नवीन व्हर्जन सॅनहॉक लॉंच होणार आहे. परंतु त्याला अजून अधिकृत दुजोरा मिळाला नाही असे दिसत आहे. तुम्हाला कदाचित माहीन नसेल टेनसेंट गेमने टीम डेथमॅच गेमप्ले लाँच केला आहे. पबजीने दिलेल्या या अपडेटमध्ये पहिल्यांदाच फास्ट-पेस्ट फायरफाइट्स आणि काही इन-गेम एडिशनसाठी 4v4 बॅटल मोड प्रोव्हाईड केले आहे. याचा युजर्सना मोठा फायदा होणार आहे असे दिसत आहे. कारण यामुळे इतर खेळाडूंसोबत काम करणे तसेच संवाद साधणे सोपे होणार आहे हे विशेष.