Jio च्या ग्राहकांसाठी वाईट बातमी ! ‘या’ प्लानच्या वैधतेत 29 दिवस ‘कपात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स जिओ वापरणाऱ्या ग्राहकांना आता वार्षिक प्लॅन मध्ये कमी वैधता मिळणार आहे. वार्षिक प्लॅन १२९९ रुपयांचा असून तो आधी ३६५ दिवसांसाठी होता परंतु , आता तो केवळ ३३६ दिवसांसाठी असणार आहे. एकूण २९ दिवसांनी ही वैधता कमी केलेली आहे. याआधी जिओने आपली न्यू इयर २०२० ऑफर बंद केली होती. त्यानंतर २१२१ रुपयांचा नवीन प्लान लाँच केला होता.

जिओने न्यू ईअर २०२० ही ऑफर बंद केली असून, नवीन प्लॅन लॉन्च केला आहे आणि त्या प्लॅनची किमंत ही २ हजार १२१ अशी आहे. आधीच्या सुविधांप्रमाणेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना सुविधा मिळणार आहेत , फक्त प्लॅनची वैधता २९ दिवसांनी कमी केली आहे. जियोने १२९९ आणि २ हजार १२१ या दोन्ही प्लॅनमध्ये वैधता कमी करण्यात आली आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये जियो युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, १.५ जीबी प्रतिदिन डेटा, मोफत एसएमएस आणि जिओ ऍप मधील ऍक्सेस मिळणार आहे. दरम्यान, अनलिमिटेड कॉलिंग केवळ जिओच्या नेटवर्कवर उपलब्ध आहे. अन्य दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी या प्लॅनमध्ये एकूण १२,००० मिनिटे मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये एकूण ५०४ जीबी डेटा युजर्सना वापरायला मिळणार आहे.

दिवसाचा डेटा संपला की युजर्सना ६४ केबीपीएस चा स्पीड मिळणार असून, या वरती फेसबुक मेसेंजर आणि व्हाटसअँप वापरता येणार आहे. जिओ मध्ये जियो टीव्ही सोबतच जिओ चित्रपट सुद्धा बघायला मिळणार आहे. या वर तुम्ही ६५० पेक्षा अधिक चॅनेल पाहायला मिळतील. जिओच्या या नव्या प्लॅनचा सामना एअरटेलच्या २, ३९८ रुपये आणि व्होडाफोनच्या २,३९९ रुपयांच्या प्लॅनसोबत होणार आहे. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये ३६५ दिवसांची वैधता मिळते. तसेच दररोज १.५ जीबी डेटा मिळतो.