Samsung Galaxy A01 2 कॅमेर्‍यासह लॉन्च, जाणून घ्या ‘किंमती’ आणि ‘फीचर्स’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्मार्टफोन युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरियाच्या स्मार्टफोन सॅमसंग कंपनीने गॅलक्सी ए सीरिजचा (Samsung Galaxy A01) स्मार्टफोन व्हिएतनाममध्ये लॉन्च केला आहे. या फोनमध्ये युजर्सला लेटेस्ट प्रोसेसर आणि दमदार कॅमेऱ्याचा सपोर्ट मिळणार आहे. या आधी कंपनीने ए51 ला भारतासोबत अन्य देशात लॉंच केले होते. सॅमसंगने गॅलक्सी ए 01 भारतात कधी लॉन्च करणार याबाबत अद्याप माहिती सांगितली नाही.

युजर्सला हा स्मार्टफोन 6 फेब्रुवारीपासून खरेदी करु शकता येणार आहे. या फोनची किंमत 8 हजार 550 रुपये असण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये तीन कलर असणार आहे. त्यामध्ये ब्लॅक, ब्लू आणि रेड असणार आहे. हा फोन शाओमी, ओप्पो आणि विवोच्या फोनला टक्कर देणार यात शंकाच नाही. या फोनमध्ये 5.7 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे.

त्याचबरोबर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 एसओसीसोबत 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल स्टोरेजचा सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे. ‘Samsung Galaxy A01’ या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप (दोन कॅमेरे) देण्यात आले आहे. यात 13 मेगापिक्सलचा आणि 2 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये युजर्सला फ्रंटमध्ये 5 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे. त्याचबरोबर फोनमध्ये ब्लूटूथ, वायफाय, जीपीएस आणि यूएसबी पोर्ट यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. तसेच 3000 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.