सावधान ! लोकलमधून 3 कोटींचे मोबाईल ‘लंपास’, ‘ही’ आहेत 3 ‘धोकादायक’ स्थानकं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईची लोकल ही ‘लाइफलाइन’ म्हणून ओळखली जात असली तरी या लोकलच्या गर्दीत चोरटे आपला हात साफ करत असल्याचे समोर आलेल्या आकडेवारीवरून दिसून येते. चाकरनाम्यांसाठी ही लोकल म्हणजे त्यांच्या रोजच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. लाईफलाईन म्हणून ओळख असणाऱ्या या लोकची दुसरी ओळख म्हणजे उशिराने धावणारी, खचाखच गर्दी, मुंबईकरांचा घाम गाळणारी ही लोकल अशी ओळख आहे. याबरोबर मुंबई लोकल आता खिसा रिकामा करणारी लोकल झाली आहे.

उपनगरीय लोकल या छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून 350 किमीपर्यंत म्हणजेच खोपोली, कसारा आणि सीएसएमटी ते पनवेल, चर्चगेट ते डहाणू पसरल्या आहेत. या लोकलमधून दररोज 80 लाख लोक प्रवास करतात. मागील वर्षभरात GRP पोलीस स्थानकात 24 हजार 10 मोबाईल चोरीच्या प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. 2018 मध्ये 32 हजार 476 प्रकरणे म्हणजेच प्रतिदीन 88 मोबाइल चोरीच्या घटना घडतात. 2019 या वर्षात चोरीला झालेल्या मोबाइलची किंमत सुमारे 3 कोटी रुपये इतकी आहे.

या स्थानकांवर चोरीचे प्रमाण सर्वाधिक
लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल चोरीचे प्रमाण कुर्ला, ठाणे आणि बोरीवल स्थानकावर जास्त आहे. या ठिकाणी मोबाइल चोरीची नोंद सर्वाधिक आहे. गर्दीचा फायदा घेऊन आणि दरवाजामध्ये उभारलेल्या प्रवाशांच्या हातातून मोबाईल हिसकावून चोरटे धूम ठोकतात. यानंतर पोलिसांकडे तक्रार केली जात असली त्याचा फारसा उपयोग होताना दिसून येत नाही. पोलिसांनी मोबाईल चोरांचा शोध घेण्यात फारसे यश मिळत नसून हे प्रमाण केवळ दहा टक्क्यांहून कमी आहे.

मोबाईल चोरी आणि सापडलेले मोबाइल
2019 मध्ये 24 हजार 10 मोबाइल चोरीला गेले होते. त्यापैकी केवळ 2 हजार 319 मोबाइल सापडले. यामध्ये 5 हजार 724 जणांना पकडण्यात आले असून 234 जण अल्पवयीन आहेत.
2018 मध्ये 32 हजार 476 मोबाइल चोरीला गेले होते. त्यापैकी केवळ 2 हजार 517 मोबाइल सापडले.

फेसबुक पेज लाईक करा