काय सांगता ! होय, आता आली eSIM सुविधा, सीमकार्डविना Vodafone-Idea चा नंबर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोणत्याही नंबरसाठी फोनमध्ये सिमकार्ड आवश्यक असते, असं तुम्हाला वाटत. मात्र, तुमचा हा अंदाज खोटा ठरु शकतो. कारण जगातील अनेक कंपन्यांनी आता eSIM सर्विस आपल्या ग्राहकांसाठी सुरु केली आहे. या सर्विसच्या माध्यमातून फोनमध्ये सिम कार्ड न टाकता फोन नंबरचा उपयोग केला जावू शकतो. भारतात आयडिया-व्होडाफोनने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी ही सर्विस उपलब्ध केली आहे.

आयडिया-व्होडाफोनने eSIM सर्विसची घोषणा केली आहे. तसेच कोणत्या फोनमध्ये ही सर्विस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याबाबत माहिती सुद्धा कंपनीने दिली आहे. अ‍ॅपलच्या iPhone 11, iPhone 11 Pro, iPhone 11 Pro Max, iPhone SE, iPhone XS, iPhone XS Max आणि iPhone XR या फोनमध्ये ही सुविधा काम करेल. तसेच Samsung Galaxy Z Flip आणि Galaxy Fold या फोनमध्ये सुद्धा ही सर्विस काम करणार असल्याचं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

सध्यातरी दिल्ली, मुंबई आणि गुजरात मधील पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हार्ड अँड डिव्हाइसेज मध्ये eSIM सर्विस देण्यात आली आहे. सिम एक इंटिग्रेटेड चिप म्हणून काम करेल. त्यासाठी वेगळे सीमकार्ड घेण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे फोनमध्ये सीम विना वापरकर्ते व्होडाफोन-आयडियाच्या नंबरवरुन कॉल, एसएमएस आणि मोबाईल डेटाचा वापर करु शकतील.

eSIM ची सर्विस अशी मिळेल

– ग्राहकांना आपल्या नंबरवरुन ई-मेल आयडी लिंक करण्यासाठी ‘eSIM email id’ लिहून १९९ वर एसएमएस करावा लागेल.
– मग ई-मेल आयडी नोंदणी केली जाईल. eSIM सुविधा वापरण्यासाठी ESIMY लिहून कन्फर्मेशन एसएमएस १९९ वर रिप्लाय पाठवावा लागेल.
– कन्फर्मेशन एसएमएस आल्यानंतर तुम्हाला कॉलवर ई-सीम साठी कन्सेन्ट द्यावा लागेल.
– तसेच रजिस्टर्ड ई-मेल आयडी वर एक क्यूआर कोड पाठवावा लागेल.
– आता डिव्हाईस सेटींग्सच्या मोबाईल डेटा आणि अ‍ॅड डेटा प्लॅन मध्ये जावून कोड स्कॅन करण्याचा ऑप्शन मिळेल.
– ई-मेलवर आलेला कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला स्क्रीन वर दिलेले इन्स्ट्रक्शन फॉलो करावे लागतील.
– त्यावेळी वाय फाय किंवा मोबाईल डेटाने कनेक्ट करावा लागेल. त्यानंतर तुमचे ई-सीम सुरु होईल.