आता व्हॉट्स अ‍ॅपवर ५ नवे फिचर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल नेटवर्किंग साईटसपैकी लोकप्रिय असणारे व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स ॲड करत आहे. व्हॉट्सअ‍ॅप अधिक युजर फ्रेंडली बनण्यासाठी आता व्हॉट्सअ‍ॅप पे, डार्क मोड, हाइड ऑनलाइन स्टेटस, फुल साइज इमेज, क्रॉस प्लेटफॉर्म बॅकअप असे पाच नवीन फीचर लाँच करण्यात येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन फीचर्सबाबत जाणून घेऊया.

व्हॉट्सअ‍ॅप पे –

व्हॉट्सअ‍ॅपवर आता चॅटिंग बरोबरच ऑनलाइन पेमेंटही करता येणार आहे. लवकरच व्हॉट्सॲपही डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप पेच्या माध्यमातून कंपनी डिजिटल पेमेंटच्या स्पर्धेत उतरणार आहे. भारतात व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या अ‍ॅपचं भारतात टेस्टिंग सुरू आहे. ते यशस्वी झाल्यानंतरच हे अ‍ॅप अनेक देशात लाँच करण्यात येणार आहे.

डार्क मोड –

रात्रीच्यावेळी काळोखात चॅटींग केल्यास डोळ्यांवर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यावर उपाय म्हणून व्हॉट्सअ‍ॅप लवकरच डार्क मोड फीचर आणणार आहे. हे फीचर ऑन केल्यावर व्हॉट्सअ‍ॅपवर बॅकग्राऊंड कलर काळा होणार आहे. त्यामुळे अधिक वेळ युजर्स चॅट करू शकतात. डार्क मोड चालू केल्यावर व्हॉट्सअ‍ॅपचे बॅकग्राउंड गडद राखाडी रंगाचं दिसू लागेल. तसंच, चॅट आयकॉन्स आणि त्यावरची नावं हिरव्या रंगात बदलतील.

हाइड ऑनलाइन स्टेटस –

व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची प्रायव्हसी जपण्यासाठी हाइड ऑनलाइन स्टेटस फीचर आणणार आहे. सध्या केवळ युजरला स्वतःचा लास्ट सीन हाइड करता येतो. नवीन फीचरमुळे ऑनलाइन स्टेटस सुद्धा लपवता येणार आहे.

फुल साइज इमेज –

सध्या व्हॉट्सअ‍ॅपवरून फोटो पाठवताना त्या फोटोची क्वालिटी आणि रिसोल्यूशन कमी होतं. त्यामुळे यूजर्स फोटो शेअरिंगसाठी अन्य टूल्सचा वापर करतात. फुल साइज इमेज फीचरमुळे आता फोटोची क्वालिटी कमी होणार नाही.

क्रॉस प्लेटफॉर्म बॅकअप –

क्रॉस प्लेटफॉर्म बॅकअप अँड्रॉइड मधून आयओएस मध्ये बॅकअप राहण्यासाठी क्रॉस प्लेटफॉर्म बॅकअप हे नवीन फीचर डेव्हलप करण्यात येत आहे. व्हॉट्सअ‍ॅपमधला डेटा सुरक्षित राहावा यासाठी बॅकअपचा पर्याय दिला जातो.

आरोग्य विषयक वृत्त – 

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

एक लिंबू ठरते आरोग्यासाठी फायदेशीर

मधमाशी चावल्यावर वेदना कमी होण्यासाठी करा ‘हे’ उपाय

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

Loading...
You might also like