खरंच की काय ? WhatsApp साठी घ्यावा लागणार नवा स्मार्टफोन ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 फेब्रुवारीपासून व्हॉट्सअ‍ॅप अनेक स्मार्टफोनवर रन होणार नाही. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपचा लाभ घेण्यासाठी किंवा चॅटींग करण्यासाठी तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करावा लागणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून कंपनीकडून याबाबत सूचना देण्यात येत आहेत.

आता आयओएस 7 आणि त्याहून जुन्या आयओएसवरील आयफोनमध्ये 1 फेब्रुवारी पासून व्हॉट्सअ‍ॅअ‍ॅक्सेस बंद होणार आहे. अँड्रॉईड 2.3.7 आणि त्याहून जुन्या व्हर्जन असलेल्या स्मार्टफोनवर व्हॉट्सअ‍ॅप सुरू होणार नाही. गुगलने दिलेल्या माहितीनुसार जवळपास 75 लाख स्मार्टफोन हे जुन्या व्हर्जनचे आहेत. आता या युजर्सना 1 फेब्रुवारी पासून अपग्रेडेड स्मार्टफोन खरेदी करावा लागणार आहे.

का घेतला हा निर्णय ?
व्हॉट्सअ‍ॅपनं सपोर्ट बंद करण्यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. गुगलनं म्हटलं आहे की, “पुढील 7 वर्षांचा विचार करता ज्याचे युजर सर्वाधिक आहेत अशा ऑपरेटींग सिस्टीमवर आता आम्हाला लक्ष केंद्रीत करायचं आहे. ज्या डिव्हाईसवर व्हॉट्स अ‍ॅप सपोर्ट बंद होत आहे त्यांचा व्हॉट्स अ‍ॅपच्या प्रवासात मोठं योगदान आहे. आता हे स्मार्टफोन जुने असल्याने येणाऱ्या नव्या फीचर्सना ते सपोर्ट करणार नाहीत. आमच्यासाठी हा निर्णय खूपच कठिण होता. युजर्सना चांगला अनुभव देण्यासाठी आम्हाला हा निर्णय घेणं गरजेचं आहे.

विंडोज ओएस सपोर्ट बंद
31 डिसेंबर 2019 पासून व्हॉट्स अ‍ॅपनं विंडोजला सपोर्ट बंद केला आहे. कंपनीनं पत्रक जारी करत याबाबत माहिती दिली होती. इतके नाही व्हॉट्स अ‍ॅप मायक्रोसॉफ्ट स्टोरवरही उपलब्ध नसेल असं सांगितलं होतं.

फेसबुक पेज लाईक करा –