मोबाईल धारकांसाठी मोठी बातमी ! 16 डिसेंबरपासुन बदलला जाणार SIM ‘कार्ड’शी संबंधित ‘हा’ नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेलीकॉम रेग्युलेटरी ऑथेरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीच्या प्रक्रियेसंबंधित मंगळवारी एक सूचना जारी केली. यामुळे 16 डिसेंबरपासून पोर्टिंगची प्रक्रिया वेगवान आणि सोपी होईल. एमएनपी अंतर्गत यूजर आता ऑपरेटरला सहज बदलता येईल आणि आपला नंबर कायम ठेवता येईल. नवी प्रक्रिया युनिक पोर्टिंग कोडच्या क्रिएशन करण्याच्या अटीवर आणण्यात आले आहे. आता नव्या नियमानुसार सर्व्हिस एरियामध्ये कोणाला आपला नंबर पोर्ट करणाऱ्यांना 3 दिवसांच्या कामकाजाच्या दिवसात पूर्ण करुन मिळेल. तर एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीत पोर्ट करण्यासाठी 5 दिवसांचा कामकाजाचा कालावधी असेल. ट्रायने स्पष्ट केले की कॉर्पोरेट मोबाइल कनेक्शनच्या पोर्टिंग कालावधीत कोणताही बदल करण्यात आला नाही.

ट्रायने सांगितले की एमएनपी प्रक्रियेत संशोधन करण्यात आले आहे. या प्रक्रियेत यूपीसी तेव्हाच बनेल जेव्हा ग्राहक आपला मोबाइल नंबर पोर्ट करण्यासाठी पात्र असेल. संशोधित एमएनपी प्रक्रिया 16 डिसेंबरला लागू होईल. मोबाइल उपभोक्ता यूपीसी क्रिएट करु शकतील आणि मोबाइल नंबर पोर्ट प्रक्रियाचा लाभ घेऊ शकतील.

ट्रायच्या नव्या नियमात समावेश
ट्रायने सांगितले की विविध अटींवर पॉझिटिव्ह अनुमोदनाने यूपीसी क्रिएट करु शकालं. उदाहरणासाठी पोस्ट पेड मोबाइल कनेक्शनच्या प्रक्रियेत आपल्या संबंधित ऑपरेटरकडून प्रमाण घ्यावे लागेल.

याशिवाय सध्याच्या ऑपरेटरच्या नेटवर्कवर याला कमीत कमी 30 दिवसात अ‍ॅक्टिव्ह करावे लागेल. लायसन्स असलेल्या सेवा क्षेत्रात चार दिवसांसाठी वैध असेल. तर जम्मू काश्मीर, आसाम आणि पूर्वोत्तर भागात ही वैधता 30 दिवस असेल.

Visit : policenama.com