नवी दिल्ली : Mobile SIM | एयरटेल (Airtel) ग्राहकांसाठी एक मोठी खुशखबर आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना रिचार्ज प्लॅनवर थेट 4 लाख रुपयांचा (Mobile SIM) लाभ देत आहे. हा फायदा 279 रुपयांच्या रिचार्ज प्लानवर मिळत आहे. जर तुमच्याकडे एयरटेलचे सिम असेल तर तुम्हाला थेट 4 लाखाचा फायदा मिळू शकतो.
जीवन विमा किंवा आरोग्य विम्याचा फायदा घेण्यासाठी प्रीमियम भरावा लागतो. परंतु काही कंपन्या किंवा सरकारी योजना जीवन किंवा आरोग्य विमा फ्रीमध्ये उपलब्ध करतात. याबाबत जाणून घेवूयात…
Airtel देते 4 लाखाचा टर्म लाइफ इन्श्युरन्स
एयरटेल आपल्या दोन प्रीपेड रिचार्जसोबत फ्री टर्म लाईफ इन्श्युरन्सची ऑफर देत आहे. हा प्लान 279 रुपये आणि 179 रुपयांचा आहे. 279 रुपयांच्या प्लानवर इतर बेनिफिट्ससह 4 लाख रुपयांचा टर्म लाइफ इन्श्युरन्स मिळत आहे. तर 179 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जवर 2 लाखांचा लाईफ इन्श्युरन्स आहे.
जनधन अकाऊंटवर विमा
जनधन योजनेंतर्गत उघडलेल्या बँक खात्यासोबत मिळणार्या रूपे डेबिट कार्डवर 30 हजार रुपयांचा जीवन विमा आणि दोन लाख रुपयांचा व्यक्तिगत अपघात विमा मिळतो.
PNB देते फ्री अॅक्सिडेंटल इन्श्युरन्स
पंजाब नॅशनल बँक RuPay Platinum Debit Card वर 2 लाख रुपयांचा फ्री अॅक्सिडेंटल इन्श्युरन्स देते.
यासोबतच तुम्हाला अनेक विशेष फायदे सुद्धा मिळतील.
EPFO देते 7 लाख रुपयांचा इन्श्युरन्स कव्हर
EPFO मेंबर्सला इन्श्युरन्स कव्हरची सुद्धा सुविधा एम्पॉई पॉझिट इन्श्युरन्स स्कीम (EDLI Insurance
cover) अंतर्गत मिळते. स्कीममध्ये नॉमिनीला कमाल 7 लाख रुपयांचे इन्श्युरन्स कवर दिले जाते.
LPG वर 50 लाख रुपयांचा विमा
LPG कनेक्शनसह ग्राहकांना पर्सनल अॅक्सीडेंट कव्हर मिळते. 50 लाख रुपयांपर्यंतचा हा विमा LPG सिलेंडरमधून गॅस लिकेज किंवा ब्लास्टमुळे होणार्या दुर्घटनेच्या स्थिती आर्थिक मदत म्हणून दिला जातो.
ITR दाखल करताना करू नका ‘या’ 6 चूका, याच महिन्यात भरायचाय इन्कम टॅक्स रिटर्न, चूक पडू शकते महागात