मोबाईलच्या स्फोटात आठ वर्षाच्या मुलाने हात गमावला

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – मोबाईलवर गेम खेळणे हा सर्वाना आवडते. मोबाईलवर गेम खेळणे एका आठ वर्षाच्या मुलाच्या चांगलेच अंगलट आले आहे. नांदडेमध्ये मोबाईलवर गेम खेळत असताना मोबाईलचा स्फोट होऊन आठ वर्षाच्या मुलाला आपला हात गमवावा लागला आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील जिरगा गावात घडली आहे. प्रशांत जाधव (वय-८) असे या मुलाचे नाव आहे.
मुखेड तालुक्यातील कमलातांडा जिरगा तांड्यावर राहणारे श्रीपत जाधव यांनी टीव्हीवरील मोबाईलची जाहिरात पाहून मोबाईल ऑनलाईन मागवला. १५०० रुपयांना तीन मोबाईल आणि त्यावर एक घडळ्या मोबत अशी आय कॉल के ७२ या कंपनीची ही जाहिरात त्यांनी पाहिली होती. ही जाहिरात पाहूनच श्रीपत जाधव यांनी मोबाईलची मागणी केली होती.

मागवलेल्या तीन मोबाईलपैकी एक मोबाईल श्रीपत जाधव हे वापरत होते. तर एका मोबाईलवर त्यांचा मोठा मुलगा प्रशांत हा गेम खेळत होता. गेम खेळत असताना मोबाईलचा स्फोट झाल्याने प्रशांत गंभीर जखमी झाला. तसेच त्याचा हात देखील भाजला. प्रशांतच्या हाताच्या तळव्यासह पाचही बोटे तुटून पडली. हा स्फोट इतका भयानक होता की त्याचा तळहाताचे तुकडे होऊन मोबाईलचे तुकडे त्याच्या छातीत आणि पोटात घुसले. यामुळे त्याला शरिराच्या आतमध्ये गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या. या घटनेमुळे जाधव कुटुंबीयावर मोठा आघात झाला आहे. तर परिसरात मोबाईल वापरणाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

You might also like