अल्पवयीन मुलाकडून चोरीचे मोबाईल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड सायबर सेलने भोसरी येथून ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाकडून 60 हजार रुपये किमतीचे 12 चोरीचे मोबाईल फोन जप्त केले आहेत.

नितीन संजय कुरकुटे (25, रा. मोशी) यांचा आणि त्यांचा मित्र विठ्ठल घोडके यांचा 2 जून रोजी रात्री मोबाईल फोन चोरीला गेला. त्याबाबत त्यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा समांतर तपास पिंपरी-चिंचवड सायबर सेलकडून देखील करण्यात आला.

सायबर सेलचे पोलीस कर्मचारी नितेश बिच्चेवार आणि अतुल लोखंडे यांना माहिती मिळाली की, एक मुलगा चोरीचे मोबाईल फोन विकण्यासाठी जय गणेश साम्राज्य भोसरी येथे येणार आहे. त्यानुसार सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस उपनिरीक्षक निलेश बोडखे, अतुल लोखंडे, भास्कर भारती, नितेश बिच्चेवार, प्रदीप गायकवाड, कृष्ण गवळी, विशाल गायकवाड, पोपट हुलगे, युवराज माने, नाजुका हुलावळे, आशा सानप, स्वप्नाली जेधे यांच्या पथकाने परिसरात सापळा रचून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने एकूण 12 मोबाईल फोन चोरल्याचे सांगितले. त्याच्याकडून 60 हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन जप्त केले.

आरोग्यविषयक वृत्त –