RPF जवानांनी अवघ्या चार मिनिटांत पकडला मोबाईल चोर 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन 
नेहमीच पोलीसांच्या अकार्यक्षमतेबद्दल त्यांना बोल लावला जातो. पण यावेळी नागपुरच्या रेल्वे सुरक्षा दलाने अवघ्या चार मिनिटात चोराला बेड्या ठोकल्या.नागपूर रेल्वे स्टेशनच्या संत्रा बाजारजवळील तिकिट खिडकीजवळ चोराने एका प्रवाशाच्या महागड्या मोबाईलवर डल्ला मारला होता. त्यानंतर अवघ्या चार मिनिटात पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने चोराला अटक केली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cb7c5598-c7a3-11e8-8d08-0d9816263157′]

अटक केलेल्या भुरट्या चोराचे नाव शेख शब्बीर शेख बब्बू  असे आहे. बब्बू हा नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात फिरत असताना जवळच झोपलेल्या प्रवाशाच्या महागड्या मोबाईलवर नजर पडली. त्यानंतर बब्बू काही क्षणात हळूच प्रवाशाच्या खिशातून मोबाईल काढला आणि तेथून पळ काढला.
नागपूर रेल्वे स्टेशनवर आधुनिक यंत्रणा म्हणजेच इंटिग्रेटेड सीसीटीव्ही सर्व्हिलन्स सिस्टम लावण्यात आली आहे. त्यावर आरपीएफचे काही जवान सतत नजर ठेऊन स्टेशन परिसरातील हालचाली टिपत असतात. शेख शब्बीरचे हे कृत्य लागलेल्या त्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले.

इथल्या उंदरांना लागलीय दारूची चटक … चोरली २०० कॅन दारू

शेख शब्बीरने झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल चोरल्याचं कृत्य आरपीएफच्या तीन जवानांनी सीसीटीव्हीमध्ये पाहिले. त्यानंतर दोन आरपीएफ जवानांनी तातडीने घटनस्थळी धाव घेतली. तर एकाने कार्यालयात बसून सीसीटीव्हीवरून शेख शब्बीरवर नजर ठेवली. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरात लागलेल्या अनेक सीसीटीव्हीच्या मदतीने अवघ्या चार मिनिटात पाठलाग करणारे दोघे आरपीएफ जवान शेख शब्बीर जवळ पोहोचले आणि त्याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून चोरीचा मोबाईलही जप्त करण्यात आला.

संबंधित प्रवाशाला आरपीएफच्या कार्यालयात बोलावून चोरीचा मोबाईल परत करण्यात आला. अश्यारितीने पोलीसांची सतर्कता व आधुनिक यंत्रणेचा योग्य वापरमुळे एक गुन्हा टळला.

सलग चौथ्या दिवशी शेअर बाजार कोसळला, डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण

[amazon_link asins=’B075778DZ9,B07D8TMSLT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1e1840c7-c7a4-11e8-8896-5fd57792ea45′]