मोबाईल चोरणारा अल्पवयीन मुलगा पुणे पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

कात्रज परिसरात रात्रीच्यावेळी मोबाईल चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून १ लाख ८९ हजार रुपयांचे १४ मोबाईल आणि १ लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई मंगळवारी (दि.९) गुजरवाडी फाटा येथे सापळा रचून करण्यात आली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’22926739-cbb1-11e8-803f-99f689ece4ed’]

मोबाईल, लॅपटॉप चोरणारा एक मुलगा गुजरवाडी येथे येणार असून त्याच्याकडे असलेले मोबाईल विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी गुजरवाडी फाटा येथे सापळा रचला. त्यावेळी ताब्यात घेतलेला अल्पवयीन मुलगा संशयितरित्या फिरताना दिसला. पोलिसांना पाहताच पळून जात असताना त्याला पकडण्यात आले. त्याच्याजवळ असलेल्या सॅकची झडती घेतली असता त्यामध्ये एक लॅपटॉप आणि १४ सॅमसंग कंपनीचे मोबाईल मिळाले.

पोलिसांनी चौकशी केली असता तो एक वर्षापासून कात्रज, मांगडेवाडी, गुजरवाडी परिसरात दिवसा व रात्रीच्या वेळी चोऱ्या करत असल्याचे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या मुलाकडून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक शिवदास गायकवाड करित आहेत.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’27c6313b-cbb1-11e8-b054-cf567c69f53f’]

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग रविंद्र सेनगावकर, परिमंडळ -२ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रविंद्र रसाळ, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक शिवदास गायकवाड, सहायक फौजदार प्रदीप गुरव, पोलीस हवालदार विनोद भंडलकर, गणेश सुतार, प्रणव सकपाळ, उज्जवल मोकाशी यांच्या पथकाने केली.
[amazon_link asins=’B0796QP4LS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2d2e0261-cbb1-11e8-aa2c-8de018e92dd5′]

आंबेगाव बुद्रुकमध्ये २ लाखांची घरफोडी
पुणे : आंबेगाव बुद्रुक येथील दळवी नगरमध्ये बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. हा प्रकार सोमवारी (दि.८) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी प्रदिप जाधव (वय-२८) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी जाधव यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरुममध्ये असलेल्या कपातील १ लाख ८२ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले. सहायक पोलीस निरीक्षक एस.व्ही हुंबरे तपास करीत आहेत.