नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डिजिटल वित्त सेवा देणारी कंपनी मोबिक्विक आता लवकरच आपल्या ग्राहकांना मिनी इंशुरन्सची सुविधा देण्याच्या तयारीत आहे. मोबिक्विक हेल्थ कंपनी इंशुरन्स मैक्स बूपा या कंपनीबरोबर शैम्पू सॅशे या कॉन्सेप्टवर आधारित नवा प्लॅन लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. मोबिक्विकचे को – फाउंडर उपासना टाकू यांनी सांगितले की देशात सध्या अनेक इंशुरन्स प्रोडक्टस आहेत, परंतू ते महाग आहेत. त्यामुळे सामान्य माणूस ते खरेदी करु शकत नाहीत. देशातील अनेक इंशुरन्स कंपन्यांचे प्रोडक्टस हे 40 हजार प्रति महिना आधिक कमाई करणाऱ्यासाठी आहेत, परंतू आम्ही सर्वात स्वस्त प्लॉन देण्याचा विचार करत आहोत. हा प्लॉन फक्त 20 रुपयांच्या प्रिमियमवर उपलब्ध असेल.
मोबिक्विकने या नव्या इंशुरन्ससाठी हेल्थ इंशुरन्स कंपनी मॅक्स बूपा बरोबर करार केलेला आहे. या करारानंतर कंपनीने होस्पीकॅश प्लॉन लॉन्च केला आहे. याचा वार्षिक हप्ता फक्त 135 रुपये इतका आहे. या अंतर्गत इंशुरन्स करणाऱ्यांना रुग्णालयात दाखल झाल्यावर 30 दिवसांपर्यत 500 रुपये कॅश अलाऊंस मिळेल. या प्लॉन सोबत 1 लाख रुपयांचा अपघात विमा मोफत देण्यात येईल.
महिन्याला 90 हजारापेक्षा अधिक अधिक इंशुरन्स –
उपासना यांनी सांगितले की कंपनी 6 महिन्यापुर्वीच इंशुरन्सच्या व्यवसायात उतरली आहे. कंपनी दर महिन्याला 90 हजार ते 1 लाख पॉलिसी विकत आहे.
MAX BUPA हेल्थ इंशुरन्सचे एमडी आणि सीईओ आशीष मेहरोत्रा यांनी सांगितले की हे बाइट साइज प्लॉनचे इंशुरन्स प्लॉनची येणाऱ्या काळात मोठी मागणी वाढणार आहे.
संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या
समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे
आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय
हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक