जेजुरी बसस्थानकात बॉम्बशोधक पथकाचं ‘मॉक ड्रील’

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – अचानक उद्भवणारा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी जेजुरी पोलीस ठाण्याच्या वतीने मंगळवारी जेजुरी बसस्थानक आवारात बॉम्बशोधक पथकाने माॅक ड्रील घेतले. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी दिली.

मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जेजुरी बसस्थानकाच्या आवारात एक बेवारस सूटकेस पडली असून त्यात बॉम्ब असल्याची माहिती त्यांना मिळाली, जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी तात्काळ याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. या अधिकाऱ्याच्या सूचने प्रमाणे अंकुश माने आणि पोलीस कर्मचारी तातडीने जेजुरी घटनास्थळी पोहोचले. बसस्थानकात असलेले सर्व प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

बॉम्ब सदृश्य सुटकेस शेजारी वाळूचे भरलेल्या गोण्या लावण्यात आल्या. या घटनेची माहिती मिळताच अर्धा तासात बॉम्बशोध पथक तसेच श्वान पथक, रुग्णवाहिका, अग्निशामक दल दाखल झाले. सोनी श्वानाने सदर सुटकेस मध्ये स्फोटके असल्याचा इशारा दिला. यावेळी बॉम्ब पथकाने या सुटकेसचा एक्स-रे काढून त्यामध्ये जिलेटिन व वायर सर्किट असल्याने सदर सुटकेस जागेवरून हलवल्यास स्फोट होणार नसल्याची खात्री करून हुक असलेल्या लांब काठीने सुटकेस मोकळ्या पटांगणात नेण्यात आली. त्यानंतर जिलेटीन कोणताही बाधा न पोहचविता बॅटरीचा स्फोट केला. पथकाचे पोलिस निरीक्षक काळे यांनी पोलिसांना माहिती दिलेल्या व्यक्तीचे अभिनंदन करून त्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले.

जेजुरी बसस्थानक आवारात बॉम्ब डिस्पोझलची रंगीत तालीम वेळी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, तसेच पोलिस स्टेशनचे चव्हाण तसेच जेजुरी पोलीस स्टेशनचे हवलदार शिवा खोकले, सचिन पड्याळ, गणेश दाभाडे, गणेश कुतवळ, धर्मवीर खांडे, संदीप कारंडे, मनीषा कुतवळ, अतुल मोरे, संदीप पवार तसेच सासवड, भोर, राजगड पोलिस स्टेशनचे ५० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला.

आरोग्यविषयक वृत्त –