जेजुरी पोलिसांकडून बसस्थानकावर ‘मॉक ड्रिल’

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) –  देशभरातील एन. आर. सी. आणि कॅब यामुळे निर्माण झालेली दंगलसदृश परिस्थिती, पुणे ग्रामीण हद्दीतील कोरेगाव भीमा येथील विजय दिनामुळे गेल्या वर्षी झालेली दंगल या पार्श्वभूमीवर जेजुरी पोलिसांनी आज तीर्थक्षेत्र जेजुरी येथील वर्दळीच्या ठिकाणी बसस्थानकावर दंगल आटोक्यात आणण्याची प्रात्यक्षिके केली.

आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जेजुरी बस स्थानकावर शे दीडशेंचा जमाव अचानक घोषणा देत येतो. घोषणा देत येणाऱ्या जमावाला पोलिसांकडून शांत राहण्याचे आवाहन करण्यात येते. मात्र जमाव दगडफेक करीत पोलिसांवरच चाल करून येतो. शेवटी पोलिसांना बळाचा वापर करावा लागतो. पोलिसांकडून अश्रूधुराचे नळकांडे फोडण्यात आले, गॅसगन ने जमाव पंगावण्याचा प्रयल करण्यात आला.

तरीही जमाव हटत नसल्याने पोलिसांकडून लाठीचार्ज केला जातो. अचानक उदभवलेल्या या प्रसंगामुळे काही काळ या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र मॉक ड्रिल असल्याचे समजल्या सगळ्यांनीच सुटकेचा नि :श्‍वास सोडला. प्रात्यक्षिक पोलिसांचे मनोबल वाढवणारे ठरले. या मॉकड्रिल मध्ये २६ पोलीस कर्मचारी, १२ होमगार्ड , ३ पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. हिंसक जमाव कसा पांगवण्यात येतो, दंगल कशाप्रकारे आटोक्यात आणली जाते याची रिहर्सल करण्यात आल्याची माहिती जेजुरी पोलीस ठाण्याचे स. पों नि. अंकुश माने यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/