केवळ एका सेलिब्रिटीला फॉलो करतात जो बायडेन, जाणून घ्या कोण आहे ती मॉडल ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जो बायडेन यांनी अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर ते आता अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर आले आहेत. या अकाउंटवरून बायडन यांनी आतापर्यंत एकूण केवळ 13 लोकांना फॉलो केले आहे. यात त्यांच्या पत्नी जिल बायडन, उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस आणि काही सहकाऱ्यांसहीत सेलिब्रिटी मॉडल क्रिसी टीगेनचाही समावेश आहे. टीगेनने स्वत:राष्ट्राध्यक्षांकडे तिला फॉलो करण्याची विनंती केली होती. ती विनंती बायडेन यांनी स्वीकारली आहे.

बायडेन यांनी टीगेनची इच्छा पूर्ण केल्यावर राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत अकाउंटवरून फॉलो केलेली ती एकमेव सेलिब्रिटी बनली आहे. खुद्द राष्ट्राध्यक्षांनीच तिला फॉलो केल्याने ती आनंदी आहे. बायडेन यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटच्या फॉलोइंग लिस्टमध्ये असलेल्या मॉडेल क्रिसी टीगेनने स्वत: ट्विट करून त्यांना विनंती केली होती. आपल्या ट्विटमध्ये तिने लिहिले होते की, ‘हॅलो, जो बायडेन, गेल्या चार वर्षांपासून डोनाल्ड ट्रम्पने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर मला ब्लॉक केल होते. काय तुम्ही मला फॉलो करू शकता.

टीगेन ट्विटरवर बिनधास्त बोलण्यासाठी लोकप्रिय आहे. तिने ट्रम्पवर अनेकदा टीका केल्यामुळे तिला ब्लॉक केले होते. 25 वर्षीय टीगेन जो बायडेन यांच्याकडून प्रभावित झाली आहे. तिला वाटतेय की बायडन यांच्या नेतृत्वात अमेरिका नव्या शिखरावर पोहोचेल. राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी वेळी टीगेन पती गायक जॉन लीजेंड आणि मुलांसोबत वॉशिंग्टन डीसीमध्ये होती. दरम्यान जो बायडेन हे त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून केवळ 46 लोकांना फॉलो करतात. त्यात गायिका लेडी गागाचाही समावेश आहे. तिने राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्यात परफॉर्म केले होते.