Model Capris Boret | ‘पतीला ‘सेक्स’साठी कधीही देऊ नका नकार’, अमेरिकन मॉडलच्या वक्तव्यावर वाद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Model Capris Boret | अमेरिकेची प्रसिद्ध मॉडल कॅप्रिस बॉरेट (model Capris Boret) सध्या आपल्या एका वक्तव्यामुळे (statement) चर्चेत आहे. एका मॅगझीनला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये कॅप्रिसने सेक्सवर आपले मत व्यक्त केले आहे. कॅप्रिसने म्हटले की, महिलांनी आपल्या पतीला सेक्ससाठी कधीही नकार देऊ नये.

कॅप्रिसने म्हटले, महिलांनी पतीसोबत दररोज सेक्स करण्यासाठी राजी झाले पाहिजे (women should agree to have physical relation with their husband every day). 5-10 मिनिट देऊन सेक्स लाईफ (Sex life) चांगले बनवता येऊ शकते. बेडरूमसंबंधीत कोणतीही तक्रार महिलांनी केली नाही पाहिजे. तुम्ही म्हणू नका की मी आज खुप थकली आहे किंवा माझं डोकं दुखत आहे. 49 वर्षांची कॅप्रिस दोन मुलांची आई आहे.

कॅप्रिसने म्हटले, सेक्स तुमच्या जीवनातील 5-10 मिनिटेच घेते. मी आणि माझा पती आम्ही दररोज सेक्स करतो. पुरुष खुप भोळे असतात आणि त्यांना खुश करणे खुप सोपे असते. जेवण देणे, कौतूक करणे आणि सेक्सद्वारे खुप सहजपणे त्यांचे मन जिंकता येते.

मॉडल कॅप्रिस बॉरेटने म्हणाली, पहिल्या लॉकडाऊनदरम्यान मी खुप अ‍ॅक्टिव्ह आणि क्रिएटिव्ह होते. तर दुसरा लॉकडाऊन माझ्यासाठी तणावाचा होता. हा तणाव दूर करण्यात सेक्स खुप उपयोगी पडला. सेक्सशिवाय रिलेशनशिप संपुष्टात येते आणि तुम्हाला ती जीवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

कॅप्रिसने म्हटले, लग्नानंतर माझे जीवन एकदम बदलले. जरी माझ्यात आणि माझ्या पतीमध्ये भांडणे होत असली तरी विवाहित असल्याने तुम्ही मानसिक प्रकारे सुद्धा जोडलेला राहता. लग्नानंतर पार्टनरला सोडून जाण्याची गोष्ट सोपी नाही.

मात्र, कॅप्रिसच्या या इंटरव्ह्यूवर मोठी टीकासुद्धा होत आहे.
युकेची प्रसिद्ध पत्रकार बेल मूनी हिने कॅप्रिसच्या वक्तव्याला वायफळ बडबड म्हटले आहे.
बेलने डेली मेलला सांगितले की,
महिलांना देण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वात वाईट आणि मूर्खपणाचा सल्ला आहे.

कॅप्रिसच्या वक्तव्यावर लेखिका केट स्पायसरने म्हटले,
सेक्सबाबत कोणत्याही महिलेला कोणत्याही प्रकारचा आदेश देणे चुकीचे आहे.
एखाद्या जीवनात सेक्स आनंद आणू शकतो तर एखाद्यासाठी एक खराब अनुभव सुद्धा असू शकतो.

पत्रकार मोनिका पॉर्टर (Journalist Monica Porter) ने म्हटले,
विवाहानंतर फिजिकल रिलेशनशिप (physical relationship) आवश्यक आहे
पण कधी-कधी सेक्ससाठी नकार (refuse sex) देणे अजिबात चुकीचे नाही.

मनोवैद्यकीय तज्ज्ञ ओलिविआ फेन (Psychologist Olivia Fenn) म्हणाल्या,
केवळ 10 मिनिटाच्या सेक्सने रिलेशनशिप वाचवली जाऊ शकते,
या गोष्टीत कोणताही तर्क नाही. हा माझा दुसरा विवाह आहे.
पण पहिल्या विवाहात आम्ही जवळपास रोज सेक्स करत होतो.

सेक्स एक गोष्ट आहे जी तेव्हा व्यवस्थित काम करते जेव्हा दोन्ही पार्टनर आपली भूमिका बरोबर निभावतात.
सेक्स ही केवळ शारीरीक नव्हे तर एकमेकांवर विश्वास व्यक्ती करण्याची सुद्धा गोष्ट आहे.सेक्स ला नेहमी रोमांचक बनवण्यापेक्षा तो स्वाभाविक प्रकारे करणे जास्त चांगले ठरू शकते.

Web Title :- Model Capris Boret | relationship model caprice married women husband physical relation life

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुण्यात बेकायदेशीररित्या 830 प्रकरणांची दस्तनोंदणी; 2 अधिकारी तडकाफडकी निलंबीत

Pune Corporation | 23 गावांच्या विकास आराखड्यावर शहरातील लोकप्रतिनिधींनी सूचना कराव्यात – उपमुख्यमंत्री अजित पवार

Pune Crime | पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये चोरी, चोरट्यांचा लाखो रुपयांवर डल्ला