मुंबई : मॉडेलवरील बलात्कार प्रकरणी 9 जणांवर FIR दाखल; निर्मात्याचा पुत्र, अभिनेता, बॉलिवूड टॅलेंट मॅनेजर, फोटाग्राफरचा समावेश

मुंबई : अंधेरीतील एका २८ वर्षाच्या मॉडेलवर झालेल्या बलात्कार (rape) प्रकरणी मुंबई पोलिसांनी ९ जणांविरुद्ध बलात्कार (rape) व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये प्रसिद्ध निर्मात्याचा पुत्र आणि अभिनेता, बॉलिवूड टॅलेंट मॅनेजर, प्रसिद्ध फोटोग्राफर, चित्रपट निर्माता यांचा समावेश आहे. २०१४ ते २०१९ दरम्यान या मॉडेलवर आरोपींनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

कोलस्टन ज्युलियन, अनिरबान ब्लाह, निखिल कामत, शील गुप्ता, अजित ठाकूर, जॅकी भगनानी, गुरुज्योत सिंग, कृष्णकुमार, विष्णुवर्धान इंदुरी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

कोलस्टन ज्युलियन हा फोटोग्राफर आहे. इतर आठ जणांमध्ये एका प्रसिद्ध निर्मात्याचा मुलगा आणि बॉलिवूडमधील टॅलेंट मॅनेजर आणि चित्रपट निर्मात्याचा समावेश आहे.

दोन वर्षापूर्वी बॉलिवूडमध्ये मी टू प्रकरणात अनेक दिग्गजावर आरोप झाले होते. या पीडित मॉडेलने १२ एप्रिल रोजी सोशल मिडियावर एक पोस्ट लिहिली होती. त्यात एका कामाच्या असाइन्मेंट दरम्यान शारीरिक व मानसिक अत्याचार झाल्याचे तिने पोस्टमध्ये म्हटले होते. लैंगिक छळ आणि शारीरिक अत्याचाराचा आरोप करत तिने एका फोटोग्राफरविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तिने या पोस्टमध्ये पोलीस अधिकार्‍यांकडे केली होती. या मॉडेलने दिलेल्या तक्रारीनंतर वांद्रे पोलिसांनी ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

Also Read This : 

 

जुन्नरच्या माजी आमदार लतानानी तांबे यांचे 85 व्या वर्षी पुण्यात निधन

 

लठ्ठपणा टाळण्यासाठी आहारात समावेश करा ‘या’ गोष्टी, जाणून घ्या

 

EDLI Benefits : PF खातेधारकाच्या अकाली मृत्यूनंतर कुटुंबियांना मिळते 7 लाख रुपयांची रक्कम, जाणून घ्या ‘क्लेम’बाबत

 

 

पाणी असणार्‍या ‘या’ 5 फळांचं नक्की सेवन करा, डिहायड्रेशनपासून वाचेल शरीर; जाणून घ्या

 

Maratha Reservation : ‘खासदार संभाजीराजेंनी मांडलेली भूमिका मराठा समाजाच्या हिताची, पण…’

 

 

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवा आता घरच्या घरी, जाणून घ्या