Model Found Dead | 21 वर्षांची प्रसिद्ध मॉडल-अभिनेत्रीचा वाढदिवशी झाला मृत्यू, सुसाईड की मर्डर?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Model Found Dead | मल्याळी मॉडेल सहानाने 12 मे 2022 रोजी तिचा 21 वा वाढदिवस (Birthday) साजरा केला. पण कुणालाही ठावून नव्हते की हा वाढदिवस तिच्यासाठी शेवटचा (Model Found Dead) दिवस ठरणार आहे. 13 मे रोजी रात्री 1 वाजता सहानाच्या मृत्यू (Sahana’s Death) ची माहिती तिच्या कुटुंबीयांना मिळाली (Husband Accused Of Murder).

 

पतीवर खुनाचा आरोप
सहानाच्या आईने पती सज्जादवर आरोप करत म्हटले की, तिची मुलगी कधीही आत्महत्या (Suicide) करू शकत नाही. सज्जाद (Sajjad) आणि त्याचे कुटुंबीय सहानाला त्रास देत होते. सहानाच्या आईने त्यांना वेगळे राहण्याचा सल्ला दिला होता, मात्र वेगळे राहूनही सज्जाद सहानाला पैशांसाठी त्रास देत असे. सहाना (Sahana) च्या आईने सांगितले की, सज्जादनेच आपल्या मुलीची हत्या केली. (Model Found Dead)

 

कुटुंबियांना भेटायचे होते सहानाला
सहानाच्या आईच्या म्हणण्यानुसार, सहानाला तिच्या वाढदिवशी कुटुंबीयांना भेटायचे होते, पण सज्जादने यावरही बंदी घातली होती. सहानाने अनेक ज्वेलरी जाहिरातींमध्ये (Jewelry Ads) काम केले असून दीड वर्षांपूर्वीच तिचे लग्न (Marriage) झाले होते.

 

आठवडाभरापूर्वी सहानाच्या आईच्या सांगण्यावरून दोघेही कुटुंबापासून वेगळे झाले आणि भाड्याच्या घरात राहायला गेले. शेजार्‍यांच्या म्हणण्यानुसार सज्जादच्या ओरडण्याचा आवाज आला. जेव्हा ते बघायला गेले तेव्हा सहाना काहीच प्रतिसाद देत नव्हती. शेजार्‍यांच्या सांगण्यावरून सज्जादने पोलिसांना माहिती दिली.

वादानंतर आढळली मृतावस्थेत
सज्जाद पूर्वी कतारमध्ये काम करत होता आणि भारतात (India) बेरोजगार होता. ’द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सहानाच्या वाढदिवसाला सज्जाद उशिरा घरी आला, त्यावरून दोघांमध्ये वाद (Argument) झाला.

 

वादानंतर सज्जादला सहाना बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळली. बाथरूममधून प्लास्टिकची दोरी (Plastic Rope) ही जप्त करण्यात आली आहे. मात्र हे प्रकरण आत्महत्येचे आहे की खुनाचे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

Web Title :- Model Found Dead | model found dead 21 year old famous model actress sahana found dead on her birthday

 

 Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Back Pain | कंबरदुखीपासून लवकर मिळेल आराम ! केवळ अवलंबा डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ 6 घरगुती पद्धती; जाणून घ्या

 

How To Live A Long Life | दीर्घायुष्य पाहिजे तर सेवन करा ‘या’ गोष्टी, शास्त्रज्ञांनी सांगितला निरोगी जीवनाचा फार्म्युला; जाणून घ्या

 

High Cholesterol-Diabetes | हाय कोलेस्ट्रॉलपासून डायबिटीजपर्यंत, डोळे सांगतात 6 आजारांचे रहस्य; जाणून घ्या