‘ही’ मॉडेल २२० पुरुषांना ‘डेट’ केल्यानंतर आता कुत्र्यासोबत लग्न करून हनीमूनला जाणार !

ब्रिटन : वृत्तसंस्था – एकेकाळी मॉडेल असलेल्या एका महिलेने २२० पुरुषांना डेट केल्यानंतर खराब अनुभव आल्याने आपल्या कुत्र्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. एलिझाबेथ होड असं तिचं नाव आहे. तिला आशा आहे की, चर्चमधील पादरी ६ वर्षीय गोल्डन रिट्रीवर असलेल्या लोगन नावाच्या कुत्र्यासोबत लग्न लावून देण्यासाठी तयार होतील. तिने कुत्र्यासोबत लग्न करण्यासाठी प्लॅनिंगही केलं आहे. एका रिपोर्टनुसार, लग्नादरम्यान महिला वेडिंग रिंग घालेल तर लोगन रिस्टबँड घालेल.

image.png

या लग्नासाठी केवळ २० लोकांना बोलावलं जाणार आहे. यानंतर एलिझाबेथ एका डॉग फ्रेंडली हॉटेलमध्ये हनीमूनला जाणार आहे. ब्रिटेनमधील बर्क्सची रहिवाशी असलेल्या एलिझाबेथचा याआधी दोन वेळा साखरपुडा झाला आहे. परंतु तिचं लग्न नाही झालं.
एलिझाबेथचं म्हणणं आहे की, ती आता पुरुषांना वैतागली आहे. ती म्हणाली की, “मी गेल्या ८ वर्षात ६ डेटींग साईट्सचा वापर करत २२० पुरुषांना डेट केलं आहे. परंतु म्हणावं तितका चांगला अनुभव नाही आला. मग मी विचार केला की, लोगनसोबत(कुत्रा) लग्न करण्याचा विचार चांगला राहिल. तो कधीच माझ्यापासून दूर जात नाही. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो.”

image.png

पुढे बोलताना एलिझाबेथ म्हणाली की, “अनेक लोकांना असे वाटत असेल की, मी वेडी झाले आहे. परंतु हे बरोबर आहे. आम्ही नेहमी सोबत राहू हे सांगण्याची ही माझी पद्धत आहे.”

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like