धुळे : संगमा चौकातील मॉडेल रस्त्याच्या कामाचा खा. सुभाष भामरे यांच्या हस्ते शुभारंभ

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील प्रभाग क्रं.16 मधील मॉडेल रस्ता कामाचा शुभारंभ झाला. कार्यक्रम स्थळी मान्यवरांचे आगमन झाल्यानंतर व्यासपिठावर नगरसेविका योगिता बागुल व प्रशांत बागुल यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकावेळीच हरिषचंद्र लोंढे यांनी जलगंगा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित धुळेचे कार्यकर्ते प्रभागात राहतात, करभरणा नागरीक करतात तरी प्रभागात रस्ते, गटार, पाणी समस्या या मार्गी लावाव्यात असा समस्यांचा पाढाच व्यासपिठावरील मान्यवरांना वाचून दाखवला. व सर्व समस्या सोडवाव्यात अशी मागणी कार्यक्रमवेळी केली.

जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी नागरीकांना सांगितले की, मागिल पंधरा वर्ष ज्या आमदारांनी सत्ता भोगली त्यांनीच विकास कामे केली नाही. मनपात भाजप सत्ता आहे. वर्षभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपाला शहरातील विकास कामासाठी शंभर कोटीचा निधी मंजुर केला. त्यातूनच हा मॉडल रस्ता तयार करण्यात येत आहे. यावेळी काही दिवस या रस्त्यावर पुल तयार करते वेळी मार्ग बंद करण्यात येईल त्यावेळी अन्य मार्गाचा नागरीकांनी वापर करुन मदत करा असे भावनिक आव्हान नागरीकांना केले. एक वर्षात शहरातील प्रत्येक भागात कामे केली आहे. काही कामे सुरु आहे. चार वर्षात पुढील कामे पुर्ण करु असे ऩागरीकांना आश्वस्त केले.

माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हे हि या कार्यक्रमास उपस्थित होते. यांनी नागरीकांना सांगितले की मुख्यमंत्री निधीतून दिलेल्या आश्वासनाची पुर्तता होत आहे. याच दरम्यान क्रिकेटची कॉमेंट्री काही मिनिट सुरू झाल्याने एकच हश्या पिकला. माझ्याकडुन योग्य ते योगदान मी करेल असेही यावेळी कदमबांडे म्हणाले.

उद्घाटन प्रसंगी बोलताना माजी संरक्षण मंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी सांगितले की, भाजप शिवसेना युतीला स्पष्ट बहमुत मिळाले होते. परंतु सत्ता लालसेपोटी ठाकरेंनी विश्वासघात केला. मनपात भाजप सत्ता स्थापन केल्यावर विकास कामासाठी निधी मिळावा या करीता मुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही सगळ्यांनी मागणी केली होती. ती मागणी मान्य झाली. त्यातुनच 12 कोटी रुपये खर्च करुन मॉडेल रस्ता तयार करण्याचे काम सुरु होत आहे. अन्य प्रभागातील कामे हि लवकरच मार्गी लागतील. मनमाड, इंदौर रेल्वे मार्गासाठी जमिनी हस्तांतरणांचे काम कापडणे, नगाव भागात सुरु झाले आहे. अन्य विकास कामे पुढील चार वर्षात पुर्ण केली जातील असे आश्वासन ऩागरीकांना संबोधतांना त्यांनी दिले.

यानंतर संगमा चौकातील प्रभाग क्रं.16 मधील मॉडेल रस्ता कामाचे उद्घघाटन नारळ वाढवुन डॉ.सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोबत माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, चंद्रकांत सोनार, युवराज पाटील, कल्याणी अंपळकर, योगीता बागुल, प्रशांत बागुल, विजय पाच्छापुरकर, शितल नवले, हरिचंद्र लोढे, बि.डी.सुर्यवंशी, अर्जुन पवार, प्रशांत मोरे, अलका पाटील याच्यासह परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/