करीनाच्या आधी सैफ अली खानच्या आयुष्यात होती ‘ही’ मॉडेल, तिच्यासाठीच दिला होता पत्नी अमृता सिंहला ‘घटस्फोट’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सैफ अली खान सध्या त्याची प्रेग्नंट पत्नी करीना कपूर आणि मुलगा तैमूरसोबत पतौडी पॅलेसमध्ये टाईम स्पेंड करत आहे. करीना ही सैफची दुसरी पत्नी असून तो चौथ्यांदा बाप होणार आहे. पहिली पत्नी अमृता सिंह हिला सैफनं घटस्फोट दिल्यानंतर करीनासोबत त्यानं लग्न केलं आहे. परंतु अमृताला घटस्फोट देण्यामागे एक इटालियन मॉडेल कारणीभूत होती जिच्यासोबत सैफचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं. याबाबत खूपच कमी लोकांना माहिती असेल.

मीडिया रिपोर्टनुसार सैफनं अमृताला चीट करत इटालियन मॉडेल रोजा कॅटलानो सोबत अफेअर केलं होतं. सैफचं रोजासोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्यानं सैफ आणि अमृता यांचं लग्न तुटल्याचं बोललं जातं.

सैफ आणि रोजा यांची भेट 2004 साली केन्यामध्ये झाली होती. त्यावेळी सैफची मॅरिड लाईफ खूप नाजूक परिस्थितीतून जात होती. त्यावेळी सैफ आणि अमृता यांच्यात खूप भांडणं होत होती. रोजाला भेटल्यानंतर सैफला रोजावर प्रेम झालं होतं.

सैफ आणि रोझा यांचं अफेअर अमृतापासून जास्त काळ लपलं नाही. सैफ फसवतो आहे हे समजल्यानंतर तिला सैफ सोबत राहण्याची इच्छा नव्हती. रोजामुळं सैफलाही अमृतापासून वेगळं व्हायचं होतं. 2004 साली सैफ आणि अमृता वेगळे झाले. यानंतर रोजा सैफसाठी मुंबईत आली. सैफनं रोजालाही फसवलं होतं जे तिला मुंबईत आल्यावर समजलं. एका मुलाखतीत रोजानं सांगितलं की, सैफनं तिच्यापासून पहिलं लग्न आणि मुलांबद्दल लपवलं होतं जे तिला भारतात आल्यानंतर कळालं. दोघंही लिव्हइन रिलेशनमध्ये राहू लागले होते. त्यावेळी सारा 10 वर्षांची होती आणि इब्राहिम 4 वर्षांचा होता.

अमृता आणि सैफचं लग्न तुटल्याचा गंभीर परिणाम हा सारा आणि इब्राहिमवर पडला होता. 4 वर्षांचा इब्राहिम सैफला विचारायचा की, तुम्ही घरी का येत नाहीत ? तेव्हा सैफकडे काहीही उत्तर नसायचं.

सैफनं एका मुलाखतीत मुलांपासून लांब राहण्याबद्दल दु:ख व्यक्त केलं होतं. तो म्हणाला होता की, माझ्या वॉलेटमध्ये माझा मुलगा इब्राहिमचा फोटो आहे. त्याचा फोटो पाहिला की, मला रडू येतं. मला साराचीही आठवण येते. मला त्यांना भेटण्याची परवानगी नाही. त्यांना माझ्याकडे येण्याची परवानगी नाही कारण माझ्या आयुष्यात कुणी नवीन स्त्री होती.

2004 साली अमृताला घटस्फोट दिल्यांतर सैफनं 2012 साली करीना कपूरसोबत लग्न केलं होतं. आता तो दुसऱ्यांदा करीनाच्या बाळाचा बाप होणार आहे.