COVID-19: ‘मॉडर्ना’ला मिळालं ‘लस’ तयार करण्यात मोठं यश, अँटीबॉडीज दर्शवितात ‘हा’ परिणाम

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूविरुद्धच्या युद्धात एक चांगली बातमी समोर येत आहे. मॉडर्ना इंक (Moderna Inc) ने सोमवारी सांगितले की प्रायोगिक कोविड-19 (experimental COVID-19 vaccine) लसीबाबत उत्साहवर्धक परिणाम मिळाले आहेत. या लसीने अशा अँटीबॉडीज तयार केल्या ज्या सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये रुग्णांमधील विषाणूला तटस्थ करण्याची क्षमता ठेवतात. ही बातमी मिळताच कंपनीचे शेअर्स 25 टक्क्यांनी वाढले आहेत.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (National Institutes of Health) च्या अभ्यासानुसार प्राथमिक परिणाम दिसले की ज्या लोकांनी या औषधाचा वापर केला, त्यांच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये अँटीबॉडीचे प्रमाण त्या लोकांच्या बरोबरीने मिळाले जे कोविड- 19 ने संक्रमित झाल्यानंतर निरोगी झाले आहेत.

मॉडर्नाच्या चाचणीत औषधांचा डोस दिल्यावर रोगप्रतिकारक शक्तीत वाढ

सहभागींना या लसीचे तीन वेगवेगळे डोस देण्यात आले आणि मॉडर्नाने नमूद केले की या डोसच्या आधारावर रोगप्रतिकारक शक्तीच्या क्षमतेत वाढ नोंदवण्यात आली. औषध तयार करणाऱ्या कंपनीने सांगितले की, mRNA-1273 ही लस प्रारंभिक अवस्थेच्या अभ्यासात सुरक्षित असल्याचेही आढळले आहे.

जुलैमध्ये होईल अंतिम टप्प्यातील चाचणी

कोरोना विषाणूची लस विकसित करण्याच्या जागतिक प्रयत्नांमध्ये मॉडर्ना नेतृत्व करत आहे आणि गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या आरोग्य एजन्सीकडून रेग्युलॅरीटी पुनरावलोकन वाढविण्यासाठी ‘फास्ट ट्रॅक’ हे लेबलही जिंकले. जुलैमध्ये चाचण्यांचा अंतिम टप्पा सुरू करण्याचा विचार ते करत आहेत.