मोदी २.० सरकारचे ‘बळीराजा’ शेतकर्‍यांना आणखी एक ‘गिफ्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने मोदी २.० सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारने ‘कुसुम योजना’ आणली होती त्या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा मिळाला होता. त्यामुळे या योजनेत अधिक सुधारणा करण्यात येणार आहे. ऊर्जा मंत्रालय सौर पंप आणि  मॉड्यूलसाठी अनुदान योजना सुरु करणार आहे. यामध्ये मॉड्यूल उत्पादकासाठी ३० % अनुदान दिले जाईल.

केंद्र सरकारने सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने किसान ऊर्जा सुरक्षा एवम् उत्थान महाभियान अर्थात कुसुम योजनेला २०१८-१९ मध्ये मंजुरी दिली होती. कृषीपंपासाठी लागणारा वीजपुरवठा अखंडित व्हावा, याकरिता शेतकऱ्यांनी पडीक, ओसाड जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारून वीजनिर्मिती करावी आणि त्याचा वापर कृषीपंपांसाठी करावा यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. त्या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना सौर पंप देण्यात येतील. यासाठी अर्थ मंत्रालयाने १० हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सौर पंपद्वारे सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा थेट फायदा मिळेल. सोलर मॉड्यूल युनिटसाठी ३० टक्क्यांपर्यंत सरकारी अनुदान मिळेल.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होईल. एक म्हणजे  त्यांना सिंचनसाठी मोफत वीज मिळेल आणि दुसरं म्हणजे जी अतिरिक्त वीज निर्माण होईल ती ग्रिडवर पाठवता येईल त्यातून त्यांना कमाई करता येईल. एखाद्या शेतक-याकडे पडीक जमीन असेल तर सौर ऊर्जा निर्मितीसाठी  ती वापरता येईल. त्या पडीक जमिनीतूनही आर्थिक उत्पन्न मिळेल.

अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात

ठाण्यातील ६६ वर्षीय ब्रेनडेड महिलेचे अवयवदान

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका

रूग्ण वेळेत पोहचण्यासाठी रुग्णवाहिकेला आता ‘यल्लो कॉरिडोर’