#Video : SCO summit ; नरेंद्र मोदींची रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासोबत चर्चा ; ‘अमेठी’चा उल्लेख

बिश्केक : वृत्तसंस्था –  पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या शांघाय सहकार्य संघटनेच्या १९ व्या शिखर संमेलनात सहभागी असून किर्गिजस्तानची राजधानी बिश्केक येथे आहेत. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची भेट घेतली आहे. या चर्चेत राहुल गांधींचा पराभव झालेल्या अमेठी मतदारसंघाचा देखील उल्लेख करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, माझ्या निवडणुकीत विजयाची भविष्यवाणी खरी ठरली आहे. तुमच्यासारख्या जुन्या आणि घनिष्ठ मित्राच्या विश्वासामुळे मला ऊर्जा मिळाली आहे. मी तुमचा खूप आभारी आहे. कारण तुम्ही मला सर्वश्रेष्ठ सन्मान ‘ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू’ ने सन्मानित केले. अमेठीमध्ये रायफल बनवण्याच्या प्रकल्पाची तुम्ही जबाबदारी घेतली त्यामुळे मी मनापासून आपला आभारी आहे. आपण जर ठरवलं तर थोड्याच वेळात आपण किती काम करू शकतो त्याचेच हे उदाहरण आहे.

जिनपिंग यांनी विजयाबद्दल केले मोदींचे अभिनंदन

बैठकीच्या सुरवातीलाच राष्ट्रपती शी जीनपिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना लोकसभेत मिळालेल्या विजयाबद्दल अभिनंदन केले. मोदींनी यावर उत्तर दिले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मला तुमचा संदेश मिळाला होता आणि या बैठकीत तुम्ही पुन्हा एकदा माझे अभिनंदन केले याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे.

सिनेजगत

#Video : ‘फिटनेस क्‍वीन’ दिशा पाटनीला टायगर श्रॉफने दिलं ‘हे’ बर्थडे ‘गिफ्ट’

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसोबतच्या नात्याबद्दल दिशा पटानीने केला मोठा खुलासा

…म्हणून ‘तिने’ अनुपम खैरला ‘kiss’ करण्यास दिला होता नकार

आमिर खानची मुलगी इरा खानने केला ‘डेटींग’बाबत मोठा ‘गौप्यस्फोट’ !