सावधान ! वाहतूकीचे नियम मोडल्यास भरघोस दंडासह ‘जेल’वारी, केंद्र सरकारकडून कायद्यास मंजूरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता केंद्र सरकारने रस्ते सुरक्षा अंतर्गत मोठे पाऊल उचलले आहे. यापुढे रस्ते अपघात आणि रस्त्यावर नियमांचे वाहन चालकांनी उल्लंघन केल्यास भरमसाठ दंडाला तुम्हाला सामोरे जायला लागू शकते. कारण त्यासंबंधीचे मोटार व्हेईकल बिलात संशोधन करुन हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. याच विधेयकात ड्राइविंग लाइसन्स डिजिटल स्वरुपात करण्या संबंधित प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

वाहन नोंदणीकृत करण्यासाठी RTO कार्यालयात एंजेंटकडून होणाऱ्या कमिशन खोरीवर बंधन आणण्यासाठी बिलात संशोधन करण्यात आले आहे. सरकार कॅबिनेटमध्ये मंजुर झालेल्या बिलाला अर्थ संकल्पात मांडू शकते. अ‍ॅब्युलन्स, फायर ब्रिगेड इत्यादी अप्तकालीन वाहनांना रस्ता न देण्यास त्यावर १०,००० रुपयांचा दंड लावण्याची मंजुरी दिली आहे.

वाहतूकीच्या ‘या’ नियमांचे उल्लंघन केल्यास भरघोस दंड –

या विधेयकात रस्ता सुरक्षेसाठी अनेक मंजूरी देण्यात आल्या आहेत. अल्पवयीन व्यक्तीकडून वाहन चालवण्यात येत असेल तर, धोकादायक पद्धतीने वाहन चालवण्यात येत असेल तर, दारु पिऊन वाहन चालवणे, ओवर स्पीड, ओवर लोडिंग यासारख्या नियमांचे उल्लघंन केल्यास भरमसाठ दंड भरावा लागेल. एवढेच नाही तर उबेर सारख्या एग्रीगेटर्स द्वारे वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर १ लाखापेक्षा अधिक दंड ठोठावण्याची तरतूद सरकारने केली आहे. विधेयकात करण्यात आलेल्या तरतूदी १८ राज्यांच्या परिवहन मंत्रालयाने केलेल्या शिफारसीवर आधारित आहेत. या शिफारशींची संसदेत स्थायी समितीकडून पडताळणी केली आहे.

सावधान, ही आहे दंडाची ‘रक्कम’ आणि ‘शिक्षा’ –

१. अल्पवयीन मुलांना वाहन चालवल्यास त्या वाहनाच्या मालकाला दोषी ठरवण्यात येईल, एवढेच नाही तर वाहनाचे रजिस्ट्रेशन रद्द केले जाईल. ३ वर्षाचा तुरुंगवास भोगवा लागू शकतो. त्याच बरोबर २५ हजाराचा दंड भरावा लागेल.
२. विधेयकात ओवर स्पीडने वाहन चालवल्यास १००० ते २००० रुपयाच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. विमा असलेल्या वाहन चालवल्यास २००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. विना हेल्मेट वाहन चालवल्यास १००० रुपयाच्या दंडाचा भार सोसावला लागू शकतो. एवढेच नाही तर ३ महिन्यासाठी लाइसेनस रद्द केले जाईल.
३. धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्यास १०० रुपयांवरून वाढवून आता ५००० रुपये करण्यात आली आहे. तर दारु पिऊन वाहन चालवल्यास नव्या कायद्याअंतर्गत १००० रुपये दंड आकरण्यात येणार आहे. ओवरलोडिंग २०००० हजार रुपयांचा दंड आकरला जाणार आहे. तर सीट बेल्ट न लावल्यास त्यावर १००० रुपये दंड ठोकवण्यात येईल.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक