मोदी सरकारकडून ई-सिगरेटवर ‘बॅन’, नियम भंग केल्यास ‘भरघोस’ दंडासह जेलची ‘हवा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ई-सिगरेटवर निर्बँध आणण्याचा निर्णय घेतला आहे. कॅबिनेटने प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. कॅबिनेटने भारतात ई-सिगरेट उत्पादनाला, विक्रीला, इंपोर्टला, एक्सपोर्टला, ट्रांसपोर्टला, डिस्ट्रीब्यूशन, स्टोरेज आणि जाहिरातीला प्रतिबंध घातला आहे. नुकतेच ग्रुप ऑफ मिनिस्टर्सने prohabitation of E Cigerettes Ordiance 2019 ची चाचपणी केली. त्यानंतर याप्रकरणी त्यांच्याकडून बदलासाठी सूचना देखील देण्यात आल्या.

काय आहे ई-सिगारेटमुळे होणारे नुकसान –
याच्या सेवनाने डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता दुप्पट असते. एका अभ्यासानुसार ई-सिगरेटचे सेवन केल्यास हार्ट अटॅकचा धोका 56 टक्क्यांपर्यंत वाढतो. जास्त सेवन केल्यास ब्लड क्लॉटची समस्या उद्भवू शकते.

दंडाची तरतूद –
या अध्यादेशानुसार आरोग्य मंत्रालयाने पहिल्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास एक वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 1 लाख रुपयांपर्यंतचा दंडाचा प्रस्ताव ठेवला आहे. तर एकापेक्षा जास्त वेळा नियमांचे उल्लंघन केल्यास 5 लाख रुपये दंड आणि 3 वर्षाचा तुरुंगवासाची तरतूद केली आहे. ई-सिगरेट, हीट नॉच बर्न स्मोकिंग डिवाइसेस, वेप अ‍ॅण्ड ई निकोटिन फ्लेवर्ड हुक्का सारख्या पर्यायी धुम्रपानाच्या उपकरणांवर प्रतिबंध आणणे आपल्या दूसऱ्या कार्याकाळातील मोदी सरकारची प्राथमिकता होती.

काय आहे ई-सिगरेट –
ई-सिगरेट एक प्रकारचे इलेक्ट्रिक इनहेलर आहे, ज्यात निकोटिन आणि इतर रसायने असतात. ही सिगरेट बॅटरी आणि ऊर्जाच्या जोरावर लिक्विडचे धुरात रुपांतर करते, ज्यामुळे सिगरेट पिणाऱ्याला सिगरेट पिल्याचा अनुभव मिळतो. ईएनडीएस अशा उपकरणांना म्हणले जाते ज्याचा प्रयोग मिसळून गरम करुन एरोसोल बनवण्यासाठी केला जातो. ज्यातून विविध स्वाद घेता येतात. परंतू ई सिगरेटमध्ये ज्या लिक्विडचा वापर केला जातो, ते अनेकदा निकोटिन असते आणि अनेकदा त्यात त्याही पेक्षा जास्त घातक रसायने असतात. याशिवाय काही ब्राॅडच्या ई-सिगरेटमध्ये फॉर्मलाडिहाइडचा वापर केला जातो, जे अत्यंत घातक आणि कॅसरला कारक ठरणारे असते.

न्यूयॉर्कमध्ये बॅन आहे फ्लेवर्ड ई सिगरेट –
न्यूयॉर्कच्या डोमेस्टिक गव्हर्नरने टीएनएजर्स आणि तरुण यांच्यात या सिगरेटमुळे वाढणारे फुफूसांचे आजार यामुळे चिंताचा विषय मागला जातो, त्यामुळे आप्तकालीन बैठक बोलावण्यात आली आणि ई सिगरेट पूर्णता: बॅन करण्यात आली. यूएसमध्ये मिशिगननंतर न्यूयॉर्क सिटी असे दुसरे राज्य आहे, जेथे फ्लेवर्ड ई सिगरेटवर बॅन लावण्यात आला आहे.

Visit : Policenama.com