Modi Cabinet Decision | कॅबिनेटच्या निर्णयाने महाराष्ट्रासह ‘या’ 8 राज्यांना सर्वात जास्त फायदा, भारतीय कंपन्या बनतील जागतिक चॅम्पियन!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Modi Cabinet Decision | आर्थिक संकटाने हैराण झालेल्या टेक्सस्टाईल सेक्टरला (Textile Sector) सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय कॅबिनेटने बुधवारी टक्सटाईल इंडस्ट्रीसाठी PLI योजनेला मंजूरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटने (Modi Cabinet Decision) हा महत्वाचा निर्णय घेतला.

कॅबिनेटच्या निर्णयानुसार, टेक्सटाईलसंबंधी 10 वेगवेगळ्या उत्पादनांसाठी पुढील 5 वर्षांपर्यंत 10683 कोटी रुपयांपेक्षा जास्त पॅकेज दिले जाईल.
पॅकेजमध्ये टीयर 2-3 च्या परिसरातील कंपन्यांना जास्त प्राधान्य दिले जाईल.
मॅनमेड फायबर अपॅरल आणि टेक्निकल टेक्सटाईलसाठी पीआयएल मंजूरी मिळाली आहे.

यामुळे भारतीय कंपन्या जागतिक बाजारात चॅम्पियन ठरतील आणि सोबतच देशाच्या ग्रामीण क्षेत्रात रोजगार निर्माण होईल असा दावा सरकारने केला आहे.
मात्र, केवळ भारतात रजिस्टर मॅन्यूफॅक्चरिंग कंपन्या यासाठी पात्र असतील.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले की, टेक्सटाईलच्या क्षेत्रात घेतलेल्या या निर्णयाने हजारो लोकांना रोजगार मिळ शकतो.
सरकारनुसार, यातून 7.5 लाख लोकांना रोजगार मिळेल.
पॅकेजमध्ये पहिला भाग 100 कोटी रुपयांपर्यंतचा प्रॉडक्शन आणि दुसरा 300 कोटी रुपयांपर्यंतचे प्रॉडक्शन ठेवले आहे.

या आठ राज्यांना होईल फायदा

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यानुसार या योजनेचा प्रामुख्याने गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, तमिळनाडु, आंध्र प्रदेश, तेलंगना, ओडिसा सारख्या राज्यांना लाभ मिळेल.
बिहार सारखे राज्य सुद्धा योजनेचा लाभ घेऊ शकते.

पॅकेजद्वारे निर्यात वाढवण्यावर भर दिला जाईल. गोयल म्हणाले, भारत यूके, ईयू आणि यूएईसारख्या पश्चिमी देशांसोबत मुक्त व्यापार करारावर सुद्धा काम करत आहे.
आम्ही भारतीय उत्पादनांवर टेरिफ प्रतिबंध ठिक करण्याची योजना बनवत आहोत.

 

Web Title : Modi Cabinet Decision | cabinet approves production linked incentive pli scheme for textiles incentives worth 10683 crore tuta

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 257 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Karuna Munde | बीड पोलीस करुणा मुंडे यांच्या सांताक्रुझमधील निवासस्थानी दाखल

NCP Meeting | राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांच्या बैठकीत शिवसेना-काँग्रेस मंत्र्यांबद्दल नाराजी