Modi Cabinet Decision | शेतकर्‍यांसाठी चांगली बातमी! केंद्राने गव्हाची किमान आधारभूत किंमत 40 रुपये तर मोहरीची 400 रूपयांनी वाढवली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Cabinet Decision | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Modi Cabinet Decision) आज गहू, हरभरा, मसूर, मोहरीसह रब्बीच्या 6 पिकांची (Rabbi Crops) किमान आधारभूत किंमत वाढवण्याचा (MSP Hike) निर्णय घेतला. नवीन एमएसपी रब्बी पिकांचा पणन हंगाम 2022-23 (RMS 2023) साठी लागू होईल. केंद्रीय कॅबिनेटने कोणत्या पिकांसाठी किती एमएसपी वाढवली आहे ते जाणून घेवूयात…

 

सरकारने कोणत्या उत्पादनावर किती वाढवली एमएसपी

कॅबिनेटने पणन वर्ष 2022-23 साठी गव्हाच्या एमएसपीमध्ये 40 रुपये प्रति क्विंटलची वाढ करून 2015 रुपये केली आहे. याशिवाय हरभराच्या किमान आधारभूत किमतीत 130 रुपयांची वाढ करून 5,230 रुपये प्रति क्विंटल केली आहे. यावेळी सर्वात जास्त वाढ तेलबियांमध्ये केली आहे.

 

मोहरीची एमएसपी प्रति क्विंटल 5,050 रुपये

केंद्र सरकारने मोहरीच्या एमएसपीमध्ये 400 रुपये प्रति क्विंटलची वाढ करून 5,050 रुपये करण्याची घोषणा केली आहे. तर, मसूरमध्ये सुद्धा 400 रुपयांची वाढ करून 5,500 रुपये प्रति क्विंटल केली आहे. बार्लीची एमएसपी 1600 रुपयांनी वाढवून 1,635 रुपये प्रति क्विंटल केली आहे.

 

शेतकर्‍यांना खर्चाच्या तुलनेत किती मिळेल लाभ

केंद्र सरकारने सूर्यफुलाच्या एमएसपीमध्ये 114 रुपये प्रति क्विंटलची वाढ करून 5,441 रुपये प्रति क्विंटल केली आहे.
केंद्र सरकारनुसार, रब्बी पिकांचे पणन वर्ष 2022-23 साठी केलेली वाढ अर्थसंकल्प 2018-19 मधील घोषणांनुसार आहे.

 

2018-19 च्या अर्थसंकल्पातील घोषणा

Advt.

2018-19 मध्ये सरकारने घोषणा केली होती की, किमान आधारभूत किंमत खर्चाच्या किमान दिडपट समान केली जाईल.
यामुळे शेतकर्‍यांना आपल्या उत्पादनांची योग्य किंमत मिळेल आणि त्यांचे उत्पादन वाढेल.

 

मोहरीवर उत्पादन खर्चापेक्षा 100 टक्के जास्त फायदा

सरकारचा दावा आहे की, एमएसपी वाढवल्यानंतर शेतकर्‍यांना मोहरीच्या खर्चापेक्षा 100 टक्के फायदा होईल.
तर मसूरवर खर्चाच्या 79 टक्के, हरभर्‍यावर 74 टक्के आणि सूर्यफुलावर 50 टक्के फायदा मिळेल.

Web Title : Modi Cabinet Decision | cabinet increased minimum support price for rabi crops including wheat chana mustard seeds pm narendra modi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Court | गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये नाचताना झालेल्या किरकोळ भांडणातून खून करणाऱ्याला जन्मठेप

Sharad Pawar | मनपा निवडणुका पुढे ढकलणे अयोग्य – शरद पवार

Pune Corporation | मैलापाणी शुध्दीकरणातील ऑनलाईन कंटीन्युएस एफ्ल्यूएंट मॉनिटरिंग सिस्टीम विकसित; महाराष्ट्रातील पुणे ही पहिली महापालिका