Modi Cabinet Decision On MSP | मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट ! खरीप पिकासाठीच्या MSP च्या वाढीस मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Cabinet Decision On MSP | शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) शेतकऱ्यांच्या हिताचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आज (बुधवार) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी 2022-23 या वर्षासाठी खरीप पिकासाठी किमान आधारभूत दरात (Minimum Support Price-MSP) वाढ करण्यास मंजुरी देण्यात (Modi Cabinet Decision On MSP) आली आहे. त्याचबरोबर 2021-22 साठी पिकाचा एमएसपी 1940 रुपये प्रति क्विंटल आहे.

 

“खरीब पिकांसोबतच रब्बी खतांसाठी पुरेसा युरीयाचा (Urea) साठा आहे. युरियाचा हा साठा डिसेंबर 2022 पर्यंत पुरू शकतो. त्यामुळे युरिया आयात करण्याची गरज नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) खतांच्या किंमतीत घट झाली आहे. आगामी काळात या किंमती आणखी घसरण्याची शक्यता आहे. सरकारने आधीच 16 लाख टन युरिया आयात केला आहे. जो पुढील 45 दिवसांत पाठवला जाईल,” अशी माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया (Union Minister Mansukh Mandvia) यांनी दिली आहे.

 

“2022-23 साठी खरीप हंगामासाठी 14 पिकासाठी किमान आधारभूत दरात (MSP) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 2022-23 साठी पिकाचा एमएसपी 2040 रुपये प्रति क्विंटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पिकाच्या एमएसपीमध्ये 100 रुपये प्रति क्विंटल वाढ केली आहे. तूरडाळीचा MSP 6600 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहै. मागील वर्षीपेक्षा यात 300 रुपयांनी वाढ केली आहे. तिळाच्या दरात प्रति क्विंटल 523 रुपयांनी वाढ केलाीय. तसेच, मूग डाळ प्रति क्विंटल 480 रुपयांनी वाढलीय. सूर्यफूलच्या दरात 358 आणि भुईमूगाच्या दरात प्रति क्विंटल 300 रुपयांनी वाढ केली आहे. असं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Union Minister Anurag Thakur) यांनी सांगितलं आहे.

 

Web Title :- Modi Cabinet Decision On MSP | Modi cabinet decision give approval to msp for kharif crops

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा