Modi Cabinet Decisions | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रासह ‘या’ 5 राज्यांतील 7000 पेक्षा जास्त गावांना दिली जाणार 4G मोबाइल फोन कनेक्टिव्हिटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत (Modi Cabinet Decisions) अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर (union minister anurag thakur) यांनी या निर्णयांची माहिती देताना सांगितले की, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, महाराष्ट्र (Maharashtra) आणि ओडिसाच्या 44 महत्वकांक्षी जिल्ह्यांमधील 7000 पेक्षा जास्त गावांमध्ये मोबाईल टॉवर कनेक्टिव्हिटी (mobile tower connectivity) प्रदान केली जाईल. (Modi Cabinet Decisions)

 

सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या गावांना 4G मोबाईल (4G Mobile) सेवा प्रदान करण्याचा निर्णय (4g mobile connectivity) घेतला. या योजनेवर 6466 कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे.

 

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितले की, असे जिल्हे जिथे टेलिकॉम टॉवर आणि कनेक्टिव्हिटी नाही. म्हणजेच पाच राज्यातील (आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, महाराष्ट्र आणि ओडिसा) 44 अशा जिल्ह्यांतील 7,266 गावांमध्ये मोबाइल टॉवरची सुविधा दिली जाईल.

 

योजनेवर 6,466 कोटी रुपये खर्च होतील. इतकेच नव्हे, नक्षलवादी प्रभावित आणि आदिवासी भागातील ते भाग जे पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या (Pradhan Mantri Gram Sadak Yojana) टप्पा 1-2 अंतर्गत रस्ते संपर्कात कव्हर करण्यात आलेले नाहीत ते लाभान्वित केले जाणार आहेत.

 

अनुराग ठाकुर यांनी म्हटले की, सरकारने निर्णय घेतला आहे की, नक्षलवादी प्रभावित आणि आदिवासी खेत्रात पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत रस्ते बनवले जातील. हे रस्ते दाट जंगले, पर्वत आणि नद्यांवरून जातील. (Modi Cabinet Decisions)

 

Web Title :- Modi Cabinet Decisions | Modi cabinet decisions 4g mobile towers connectivity will be provided to 7000 villages

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

WhatsApp Desktop App | आले WhatsApp चे नवीन अ‍ॅप, विना फोन डेस्कटॉपवर वापरा WhatsApp, जाणून घ्या कसे?

Paduka Darshan ceremony | लहू बालवडकर सोशल वेलफेअरच्या पुढाकारानं भारतातील 12 शक्तिपीठांच्या पादुका दर्शनाचा सोहळा

PM Kisan | खुशखबर ! शेतकर्‍यांना 10 व्या हप्त्यात 4000 रुपयांसह मिळतील 3 आणखी फायदे, जाणून घ्या कसे

Modi Government | दररोज 7 रूपयांची बचत करून दरमहा मिळवा 5000 रूपये, जाणून घ्या मोदी सरकारची ‘ही’ जबरदस्त स्कीम

IND Vs NZ | न्यूझीलंडविरुद्धच्या T20 सिरीजपूर्वी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितला टीम इंडियाचा ‘मास्टर प्लॅन’

Dr. Bhagwat Karad | विमानातील प्रोटोकॉल तोडत महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्याने वाचवले प्रवाशाचे प्राण; पीएम मोदींनी दिली शब्बासकी