Modi Cabinet Expansion | मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारापुर्वीच मोठी खळबळ ! केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांचा राजीनामा

नवी दिल्ली – वृत्त संस्था – मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारापुर्वीच (Modi Cabinet Expansion) मोठी बातमी समोर आली आहे. बुधवारी सायंकाळी 6 वाजता मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. दरम्यान, सध्याच्या मंत्रिमंडळातील काही जणांना डच्चू दिला जाणार होता. आता केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल (ramesh pokhriyal) यांना हटवण्यात आलं आहे. त्यांनी राजीनामा दिला असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश पोखरियाल निशंक (ramesh pokhriyal) यांना त्यांच्या खराब प्रकृतीमुळे मंत्रिपदावरून हटवण्यात आलं असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील खासदार देबोश्री चौधरी यांना देखील मोदी मंत्रिमंडळातून (Modi Cabinet Expansion) हटविण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देबोश्री चौधरी यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांचा देखील राजीनामा येऊ शकतो.

केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संतोष गंगवार हे बरेली लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत. त्याच्याऐवजी उत्तरप्रदेशातील बडया नेत्याला मंत्रिमंडळात संधी मिळू शकते.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

 

Web Title : modi cabinet expansion debasree chaudhuri ramesh pokhriyal nishank remove ministers list

हे देखील वाचा

दिग्गज अभिनेता दिलीपकुमार यांचं निधन, मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

Modi Cabinet Expansion | नारायण राणे, प्रीतम मुंडे, शिंदेंसह संभाव्य मंत्री पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दाखल

Movies Live Blog | दिलीपकुमार यांनी महात्मा गांधींच्या अनुयायांसोबत घालवली होती येरवडा कारागृहात रात्र; पुण्याशी होते त्यांचे ऋणानुबंद

Shivsena | फडणवीसांच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 19 आमदारांचे निलंबन झाले त्यावेळी सामूहिक हत्याकांड वाटलं नव्हतं का? – शिवसेना