Modi Cabinet Expansion | दोन दिवसांत होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार? महाराष्ट्रातून नारायण राणेंसह ‘या’ नावांची चर्चा

नवी दिल्ली (New Delhi): वृत्तसंस्था – केंद्रातील मोदी मंत्रिमंडळाचा विस्तारासंदर्भात (Modi Cabinet Expansion) मोठी माहिती समोर आली आहे. याच आठवड्यात मोदी मंत्रिमंडळ विस्तार (Modi Cabinet Expansion) होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, 7 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) मंत्रिमंडळाचा विस्तार जाहीर होईल. या मंत्रिमंडळामध्ये 17 ते 22 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातून नारायण राणे (Narayan Rane), हिना गावित (Hina Gavit) आणि रणजित नाईक निंबाळकर (Ranjit Naik Nimbalkar) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. आगामी वर्षामध्ये ज्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या राज्यातील नेत्यांना या मंत्रिमंडळ विस्तारात प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. ‘सोशल इंजिनिअरिंग’चाही यामध्ये महत्त्वाचा वाटा असू शकतो. मंत्रिमंडळ विस्तारामुळे सद्य मंत्र्यांचा अतिरिक्त भार हलका होणार आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात उत्तर प्रदेशला प्राधान्य

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये उत्तर प्रदेशातील 3 ते 4 जणांचा मोदी कॅबिनेटमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. यामध्ये अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांच्या नावाची चर्चा आहे. तर बिहारमधून सुशील मोदी, जेडीयूचे आर सी पी सिंह आणि लोक जनशक्ती पक्षाचे पशुपती कुमार पारस यांना मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

ज्योतिरादित्य शिंदेंना मंत्रिपद मिळणार ?

मध्य प्रदेशातून दोन नावांची चर्चा आहे. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) आणि राकेश सिंह यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार का ? हे लवकरच समजेल. तर पश्चिम
बंगालमध्ये शांतनू ठाकूर तसेच निशीथ प्रामाणिक यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची
शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, आसाम, ओडिशा मधून प्रत्येकी एकाची वर्णी लागू शकते.

या मंत्र्यांचा भार कमी होणार ?

सध्या अतिरिक्त मंत्रालयाचा भार पेलणाऱ्या पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, प्रकाश जावडेकर, नितीन गडकरी, डॉ. हर्षवर्धन, नरेंद्र सिंह तोमर, रविशंकर प्रसाद, स्मृती इराणी, हरदीप सिंह पुरी यांच्यावर असलेला अतिरिक्त भार कमी होण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळा 28 जणांचा समावेश ?

उल्लेखनीय म्हणजे, केंद्रीय मंत्रिमंडळात 81 सदस्यांचा समवेश करता येऊ शकतो. सध्या केंद्रात 53 मंत्री आहेत. त्यामुळे आणखी 28 जणांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते.

हे देखील वाचा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 161 नवीन रुग्ण, 37 रुग्णांना डिस्चार्ज


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Modi Cabinet Expansion intensified likely in 7th july narayan rane heena gavit

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update