Modi Cabinet Expansion | मोदींच्या मंत्रिमंडळातून राज्यातील 2 मंत्र्यांना डच्चू? ‘या’ दोघांना मिळणार संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक (Union Cabinet meeting) आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये आगामी मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात (Modi Government Cabinet Reshuffle) चर्चा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Modi Cabinet Expansion) करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरु झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून प्रीतम मुंडे (Preetam Munde) आणि नारायण राणे (Narayan Rane) यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर दोन मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

नारायण राणे दिल्लीत (Narayan Rane in Delhi)

नारायण राणे (Narayan Rane) हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.
त्यांचं नाव चर्चेत येत नाही तोच प्रीतम मुंडे यांचंही नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत आलं आहे. जर प्रीतम मुंडे (Preetam Munde) यांना कॅबिनेट विस्तारामध्ये (Cabinet expansion) मंत्रिपद मिळालं, तर गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबात दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपद जाईल.

यामुळे मंत्रिमंडळ विस्तार

सध्या मोदी सरकारमध्ये (Modi government) अनेक मंत्र्यांकडे मंत्रालयाच्या अतिरिक्त जबाबदारी (Additional Responsibilities) आहे.
त्यामुळे या जबाबदारी कमी करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार (Union cabinet expansion) होणार असल्याची चर्चा सुरु आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्यावर आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री यांच्यासोबत तीने ते चार वेळा सल्लामसलत केली असल्याची माहिती समोर आली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारावर मोदींची सविस्तर चर्चा

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दोन दिवसापर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah), केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Union Transport Minister Nitin Gadkari) आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग (Union Defense Minister Rajnath Singh) यांच्यासोबत पाच ते सहा तास विस्ताराने चर्चा केली. अशी माहिती देखील पुढ येत आहे.

पंतप्रधानांकडून मंत्रालयाचा आढावा (Prime Minister reviews the Ministry)

मागील 20 दिवसांपासून विविध मंत्रालयाच्या मंत्र्यांना बोलून त्यांच्या मंत्रालयाचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत आहेत.
शिवसेनेचे (Shivsena) अरविंद सावंत (Arvind Sawant) आणि शिरोमणी अकाली दलाच्या (Shiromani Akali Dal) हरसिमरत बादल कौर (Harsimrat Badal Kaur) यांनी राजीनामा दिल्यानंतर हे दोन्ही मंत्रिपदं अद्याप रिक्त आहेत.
शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (National Democratic Front) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर या जागा रिक्त झाल्या आहेत. याशिवाय रामविलास पासवान (Ramvilas Paswan) यांचे निधन झाल्यानंतर त्याची देखील जागा रिक्त झाली आहे.

राज्यातील दोन मंत्र्यांना डच्चू

लवकरच अनेक मंत्र्यांकडे असलेल्या अतिरिक्त मंत्रालयाचा कारभार काढून घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्ताने कारभार वाटप करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे.
अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. महाराष्ट्राच्या खात्यामध्ये सध्या सहा मंत्री आहेत.
त्यापैकी दोन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे.
लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असून काहींचा खातेबदल होईल अशी चर्चा आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title :  Modi Cabinet Expansion | modi government cabinet reshuffle opportunity for 2 ministers from maharashtra but other 2 are come down

हे देखील वाचा

Pune Crime News | लष्कर परिसरात तोडफोड केल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून एकाला अटक

Swargate Police Station |अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; गळा दाबून जीवे मारण्याची दिली धमकी

Union Minister Raosaheb Danve । संजय राऊतांचं रावसाहेब दानवे यांना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘आमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेचं टाळं उघडलं’