Modi Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता भाजप संघटनेतही होणार बदल; प्रकाश जावडेकर, ‘या’ दिग्गजांना मिळणार महत्त्वाची जबाबदारी

 नवी दिल्ली : वृत्त संस्था – मोदी सरकारचा नुकताच मंत्रिमंडळ विस्तार Modi Cabinet Expansion झाला. यामध्ये अनेक चेहऱ्यांना संधी देण्यात आली. त्यांनतर आता भाजप BJP संघटनेतही पदाधिकाऱ्यांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संघटनेत अनेक पदे रिक्त असताना थावरचंद गहलोत यांना राज्यपाल बनवले. त्यामुळे महत्त्वाच्या ससंदीय मंडळात एक जागा रिक्त झाली असून भूपेंद्र यादव सरकारमध्ये गेल्यामुळे महासचिवपदही रिक्त झाले आहे.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपाध्यक्ष, महासचिव आणि २५ मोर्चा आणि विभागांच्या प्रमुखांच्या रूपात पक्षात संघटनस्तरावर मोठा बदल होऊ शकतो. पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा लवकरच नव्या टीमची घोषणा करतील विशेष म्हणजे संघटनात्मक बदलामध्ये नड्डा यांचा भर हे विभाग आणि मोर्चा यांना नवी दिशा देण्यावर असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत नाही. या नियुक्त्या करताना एक व्यक्ती, एक पद या नियमाचे पालन करण्यात येईल. या नियुक्त्या करताना आगामी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना सामोरे ठेवले जाणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद आणि डॉ. हर्षवर्धनसह काही मोठ्या नेत्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला असून या नेत्यांना संघटनेत महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल. अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि अनंत कुमार यांच्या निधनापासूनच संसदीय बोर्डमधील त्यांची जागा रिक्त आहे. थावरचंद गहलोत राज्यपाल बनल्यानंतर एक रिक्त जागा वाढली आहे. संसदीय बोर्डात एक सदस्य अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जनजातीचे प्रतिनिधित्व करतो म्हणून कोणत्याही दलित किंवा आदिवासी नेत्यालाच त्या जागेवर घेतले जाईल.

गोयल यांना संधी ?

राज्यसभेत गहलोत पक्षाचे नेते होते. आता ही जबाबदरी उपनेते पीयूष गोयल यांना दिली जाऊ शकते.
मुख्तार अब्बास नकवी, निर्मला सीतारमण, धर्मेंद्र प्रधान आणि प्रकाश जावडेकर यांना ही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
तर शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री बनल्यानंतर पक्षात उपाध्यक्षाचे रिक्त झालेले पद अजून भरले गेलेले नाही. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या सर्व १० उपाध्यक्षांच्या पदांवरही त्यातील काही जणांची नियुक्ती केली जाऊ शकते.

Web Title :  Modi Cabinet Expansion | now there will be big change
bjp organization too along javadekar these leaders can get big

 

हे देखील वाचा

Pune Police News | 27 वर्षीय तरूणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार,
पोलिस कर्मचार्‍याला पोलिस कोठडी

Basmati Rice | ‘किंग ऑफ राईस’ – बासमती चे उत्पादन कमी – ‘फाम’चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा

Modi Cabinet Expansion | केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नारायण राणेंनी मानले ‘या’ 4 जणांचे आभार

UIDAI ने Aadhaar Card संबंधीत 2 विशेष सेवा अनिश्चित काळासाठी केल्या बंद; जाणून घ्या