Modi Cabinet Expansion | केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा, आता हेल्थ मिनीस्टर कोण?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Modi Cabinet Expansion) पुर्वीच केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी राजीनामा दिला असल्याचं वृत्त समोर आलं. त्यानंतर काही वेळातच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr Harsh Vardhan) यांनी देखील राजीनामा दिल्याचं वृत्त एएनआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे. त्यामुळे आता नवीन आरोग्यमंत्री कोण याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मोदी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल (Modi Cabinet Expansion) होणार हे आता जवळपास निश्चितच झाले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, डॉ. भारती पवार यांच्यासह इतर नावे चर्चेत आहेत.

केंद्रीय शिक्षण मंत्री आणि केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी राजीनामा दिल्याने संबंधित खाते कोणाकडे सोपविले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोना संकटादरम्यान डॉ. हर्षवर्धन (Dr Harsh Vardhan) यांनी आरोग्य मंत्रालयाची धुरा सांभळली होती. आताही कोरोनाचं संकट देशासमोर उभं आहे. त्यामध्ये डॉ. हर्षवर्धन यांनी राजीनामा दिल्याने हे खाते कोणाकडे सोपविले जाणार याबाबत चर्चा सुरू आहे.

Web Title : Modi Cabinet Expansion | union health minister dr harsh vardhan resigns union cabinet ahead cabinet reshuffle

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Rate Today । 9,000 रुपयांनी स्वस्त झालेल्या सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर

Anil Deshmukh | बडतर्फ सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे वसुलीची रक्कम देशमुखांच्या PA ला दयायचा; ईडीचा दावा

Yavatmal News । संशयिताचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू; संतप्त जमावाचा दारव्हा पोलीस ठाण्यावर हल्ला, 2 पोलिस जखमी (व्हिडिओ)