नवीन शैक्षणिक धोरण : आता रसायनशास्त्रासह ‘संगीत’, भौतिकशास्त्रसह ‘फॅशन’ डिझायनिंगसह शिकू शकतात विद्यार्थी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : केंद्रातील मोदी सरकारने नवीन शिक्षण धोरणाला मान्यता दिली आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना सरकारने अनेक प्रकारे दिलासा दिला आहे. 34 वर्षानंतर आलेल्या नवीन शिक्षण धोरणांतर्गत शाळा-महाविद्यालयीन प्रणालीत मोठे बदल करण्यात आले आहेत. आतापर्यंत विद्यार्थी महाविद्यालयात फक्त रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र सह गणित शिकू शकत होते, परंतु नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत आता विद्यार्थ्यांना ‘फॅशन डिझायनिंग विथ फिजिक्स आणि म्युझिक विथ केमिस्ट्री’चे शिक्षण घेता येणार आहे. बुधवारी सरकारने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

सरकारकडून सांगण्यात आले की, सध्याच्या शैक्षणिक धोरणांतर्गत भौतिकशास्त्र ऑनर्ससह रसायनशास्त्र आणि गणित घेता येते. यासोबत फॅशन डिझायनिंग घेता येऊ शकत नव्हते. परंतु नवीन धोरणात, मेजर आणि मायनर प्रणाली असेल. नव्या यंत्रणेविषयी माहिती देताना सरकारने सांगितले की, मेजर प्रोग्रॅमव्यतिरिक्त मायनर प्रोग्रॅमदेखील घेता येतील. याचे दोन फायदे होतील. पहिला फायदा असा आहे की, जे विद्यार्थी आर्थिक किंवा इतर कारणांमुळे ड्रॉप आउट झाले आहेत ते सिस्टीममध्ये परत येऊ शकतात. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांमध्ये रस आहे, जसे कि म्युझिक त्यांच्यासाठी अद्याप कोणतीही व्यवस्था नाही. नवीन शैक्षणिक धोरणात मेजर आणि मायनरच्या माध्यमातून ही व्यवस्था राहील.

करण्यात आले हे देखील बदल
पत्रकार परिषदेत सरकारने म्हटले आहे की, आजच्या व्यवस्थेत जर एखादा विद्यार्थी अभियांत्रिकीचा 4 वर्ष अभ्यास करून किंवा 6 सेमेस्टर्सचा अभ्यास करून पुढील अभ्यास करू शकत नसेल तर त्याच्याकडे कोणताही उपाय नाही. विद्यार्थी आउट ऑफ द सिस्टम होतो. नवीन प्रणालीत असे असेल की एक वर्षानंतर प्रमाणपत्र, दोन वर्षानंतर डिप्लोमा, तीन किंवा चार वर्षानंतर डिग्री मिळेल.

मल्टीपल एन्ट्री थ्रु बँक ऑफ क्रेडिट अंतर्गत विद्यार्थ्यांचे प्रथम, द्वितीय वर्षाचे क्रेडिट डिजिलोकरमार्फत जमा केले जाईल असे सरकारने म्हटले आहे. जेणेकरुन जर एखाद्या कारणास्तव विद्यार्थ्यास ब्रेक घ्यावा लागला असेल आणि एका ठराविक वेळेत परत आला तर त्याला प्रथम आणि द्वितीय वर्षाची पुनरावृत्ती करण्यास सांगितले जाणार नाही. विद्यार्थ्यांची पत शैक्षणिक क्रेडिट बँकेत असेल. या प्रकरणात, विद्यार्थी त्याचा पुढील अभ्यासांसाठी वापर करेल.