मोदी सरकारनं घेतले ‘हे’ 2 मोठे निर्णय ! 11 लाखापेक्षा अधिक लोकांवर होणार परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेंतर्गत आज झालेल्या बैठकीत कॅबिनेटने दोन महत्वाचे मोठे निर्णय घेतले आहेत. एक मोठा निर्णय म्हणजे रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनसची घोषणा आणि दुसरा निर्णय म्हणजे ई-सिगरेटवर सरकारने आणलेला प्रतिबंध. बोनस संबंधित निर्णयामुळे 11 लाख पेक्षा जास्त लोकांना फायदा मिळणार आहे.

11 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार बोनसचा फायदा –

कॅबिनेटने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांची माहिती देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, या वर्षी रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे. ते म्हणाले की रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसाचे वेतन बोनस म्हणून मिळणार आहे. या बोनसवर सरकार 2024 कोटी रुपये खर्च करणार आहे. या निर्णायाचा फायदा 11.52 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे. रेल्वे विभागाकडून जवळपास 12 लाख कर्मचाऱ्यांना दर वर्षी दसऱ्या आधी उत्पादकता आधारित बोनस देण्यात येतो, यामुळे रेल्वेवर 2024 कोटीचे ओझे वाढणार आहे.

ई-सिगरेटवर प्रतिबंध –

बैठकीत ई-सिगरेटवर निर्बँध आणण्याचा निर्णय घेतला आहे. कॅबिनेटने प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. कॅबिनेटने भारतात ई-सिगरेट उत्पादनाला, विक्रीला, इंपोर्टला, एक्सपोर्टला, ट्रांसपोर्टला, डिस्ट्रीब्यूशन, स्टोरेज आणि जाहिरातीला प्रतिबंध घातला आहे. नुकतेच ग्रुप ऑफ मिनिस्टर्सने prohabitation of E Cigerettes Ordiance 2019 ची चाचपणी केली. त्यानंतर याप्रकरणी त्यांच्याकडून बदलासाठी सूचना देखील देण्यात आल्या.

दंडाची तरतूद –

या अध्यादेशानुसार आरोग्य मंत्रालयाने पहिल्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास एक वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 1 लाख रुपयांपर्यंतचा दंडाचा प्रस्ताव ठेवला आहे. तर एकापेक्षा जास्त वेळा नियमांचे उल्लंघन केल्यास 5 लाख रुपये दंड आणि 3 वर्षाचा तुरुंगवासाची तरतूद केली आहे.

ई-सिगरेट, हीट नॉच बर्न स्मोकिंग डिव्हाइसेस, वेप अॅण्ड ई निकोटिन फ्लेवर्ड हुक्का सारख्या पर्यायी धुम्रपानाच्या उपकरणांवर प्रतिबंध आणणे ही दूसऱ्या कार्याकाळातील 100 दिवसातील निर्णयातील मोदी सरकारची प्राथमिकता होती.

visit : policenama.com

You might also like