”पुन्हा भाजपची सत्ता येईल, पण पंतप्रधान मोदीच होतील का शंकाच”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील याबाबत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि खासदार नारायण राणे यांनी शंका व्यक्त केली आहे. औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेत नारायण राणेंनी शिवसेनेवर टीका केली. तेव्हा त्यांनी मोदींच्या पुन्हा पंतप्रधान होण्यावर शंका उपस्थित केली.

देशात भाजपचेच सरकार येईल, भाजपला 200 जागा मिळतील. पण, पंतप्रधान कोण होईल हे सांगता येत नाही. तरीही, मोदी पंतप्रधान व्हावेत ही अपेक्षा आहे, असं नारायण राणेंनी म्हटलं आहे. तसंच महाराष्ट्रात लोकसभेच्या किमान 5 जागा तरी लढवणार, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

लोकसभेत एकूण पाच जागा महाराष्ट्रात स्वाभिमान पक्ष लढविणार आहे. अन्य उमेदवार नंतर जाहीर करण्यात येतील. जिथे शिवसेना लढत आहे, तिथलेच हे उमेदवार असतील, असं राणे यांनी स्पष्टपणे सांगितलं.

स्वाभिमान पक्षाला येणारी मते नरेंद्र मोदींना असतील का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर राणेंनी आपल्या स्टाईलंन उत्तर दिलं. तसे समजायला हरकत नाही. अर्थात देशात पुन्हा भाजपचीच सत्ता येईल. दोनशे तरी जागा भाजपला मिळतील. पंतप्रधान कोण होईल, हे आताच सांगता येणार नाही, असं त्यांनी म्हटलं.

आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर इतर उमेदवार जाहीर होतील आणि पक्षाचे चिन्ह येत्या आठ दिवसांत मिळेल, असं त्यांनी सांगितलं. तसंच यावेळी चंद्रकांत खैरे यांना पाडायचंय, असां निर्धार त्यांनी बोलून दाखवला. दरम्यान, पत्रकारांनी, काँग्रेसमध्ये असताना तुम्ही खैरेंची सरपंच होण्याचीही लायकी नाही, असं म्हणाला होता, याची आठण करून दिली. त्यावर, हो म्हटलो होतो. तुमची इच्छा असल्यास मी पुन्हा तसं म्हणायला तयार आहे, असं राणेंनी यावेळी म्हटलं.

ह्याहि बातम्या वाचा –

हळद लागण्यापूर्वीच भावी वधूचा दुर्दैवी मृत्यू

‘टेलीग्राफचे पत्रकार नीरव मोदीला शोधू शकतात , परंतु चौकीदार नाही’…!

पंकजा मुंडेंना न्यायालयाचा दणका

‘गावात आम्हाला पाणी नाही’ असं म्हणणाऱ्या गावकऱ्याला बबनराव लोणीकरांची दमदाटी