मोदींना बहुमत मिळाल्यानंतर वाटली मिठाई आणि छातीवर चाकूने कोरले मोदींचे नाव

पाटणा : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकसभा निवडणूकीत बहुमत मिळाले. मोदींची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे. मात्र त्यांचे समर्थक काय करतील याचा नेम नाही. बिहारमध्ये एका समर्थकाने मोदींचा विजय अनोख्या पध्दतीने साजरा केला. बहुमत मिळाल्यावर त्याने मिठाई वाटत चक्क छातीवर मोदींचे नाव कोरले आहे.

सोनू पटेल असे या मोदी समर्थकाचे नाव आहे. तो बिहारचा राहणारा आहे. गुरुवारी निकाल जाहीर झाले. त्यानंतर सोनूने परिसरात मिठाई वाटली. त्यानंतर चक्क त्याने सुरीने आपल्या छातीवर मोदींचे नाव कोरले. त्यावेळी त्याच्या छातीतून रक्तस्त्राव होऊ लागला. तरीही तो रडला नाही. तर त्याच्या चेहऱ्यावर स्मीत हास्य होते.

सोनूच्या मते मोदी हे देशाचे भविष्य आहेत. ते देशाच्या सुक्षेसाठी नेहमीच तत्पर असतात. त्यांच्यासाठी त्याग केला पाहिजे.