केंद्र सरकारनं रद्द केली 4 कोटीहून जास्त रेशन कार्ड, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : सुमारे सात वर्षांत 4 कोटींपेक्षा जास्त रेशन कार्ड रद्द करण्यात आली आहेत. ही माहीती ग्राहक कार्य, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. असे करण्याचे नेमके कारण काय आहे ते जाणून घेवूयात…

2013 ते 2020 च्या दरम्यान
मंत्रालयानुसार योग्य लाभार्थी ओळखण्यासाठी 2013 ते 2020 च्या दरम्यान 4.39 कोटी बनावट रेशन कार्ड रद्द करण्यात आली आहेत. मात्र, रद्द करण्यात आलेल्या रेशन कार्डांच्या बदल्यात योग्य आणि योग्य लाभार्थी/कुटुंबियांना नियमित पद्धतीने नवीन कार्ड जारी करण्यात आली आहेत.

का घेण्यात आला निर्णय
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने (एनएफएसए) सांगितले की, सार्वजनिक वितरण व्यवस्थेत (पीडीएस) सुधारणा आणि पारदर्शकता अभियान राबवण्यात आले होते.

81.35 कोटी लोकांना मिळत आहे रेशन
मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पीडीएसद्वारे 81.35 कोटी लोकांना खुप कमी किंमतीत धान्य उपलब्ध करून दिले जात आहे. हे 2011 च्या जनगणनेनुसार देशाच्या लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोक आहेत.

स्वस्त दरात रेशन
सध्या देशातील 80 कोर्टीपेक्षा जास्त लोक केंद्राद्वारे जारी सवलतीच्या दरात – तीन रुपये, दो रुपये आणि एक रुपये प्रति किलोग्रॅमच्या दराने प्रत्येक महिन्याला धान्य (तांदूळ, गहू आणि इतर धान्य) उपलब्ध करून दिले जाते.

आधारशी लिंकिंग बंधनकारक
रेशन कार्ड आधारशी लिंक करणे आता अनिवार्य झाले आहे. जर तुम्ही आधारशी लिंक केले नसेल तर आगामी काळात रेशन कार्ड रद्द होऊ शकते.

एक देश, एक रेशन कार्ड अनिवार्य
सरकारने नव्या वर्षात एक देश आणि एक रेशन कार्ड सुद्धा अनिवार्य करण्याची घोषणा केली होती. याचा अर्थ हा आहे की, तुम्ही एक रेशन कार्डवर देशातील कोणत्याही भागातील रेशन दुकानातून तुमच्या वाट्याचे रेशन घेऊ शकता.