Coronavirus Impact : ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर मोदी सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय, 3 कोटीहून अधिक जणांना ‘दिलासा’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा कहर जगभर पसरला आहे. या विषाणूमुळे हजारो लोकांनी आपला जीव गमावला, लाखो लोक संक्रमित झाले आहेत. अशा परिस्थितीत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कर्मचारी राज्य विमा महामंडळाशी (ईएसआयसी) संबंधित कर्मचारी व कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे.

खरं तर, कोरोना विषाणूचा परिणाम पाहता सरकारने कर्मचार्‍यांच्या राज्य विमा कायद्यातील तरतुदी तात्पुरत्या बदलल्या आहेत. यामुळे ईएसआयसी कर्मचारी आणि कंपन्यांना त्यांचे ‘मासिक विमा काँट्रीब्युशन’ सादर करण्यास अधिक वेळ देण्यात आला आहे.

ईएसआयसीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ‘विमा काँट्रीब्युशन’ सादर करण्यासाठी अतिरिक्त 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. कायद्यानुसार फक्त 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी दिला जातो.

उदाहरण द्यायचे झाले तर मार्च 2020 साठी विमा काँट्रीब्युशन जमा करण्याची डेडलाईन क्रमशः 15 मार्च आणि 15 एप्रिल आहे. परंतु नवीन नोटिफिकेशन नुसार या दोन महिन्यांचे कॉन्ट्रीब्युशन 15 एप्रिल 2020 आणि 15 मे 2020 पर्यंत केले जाऊ शकते

गेल्या वर्षी केंद्र सरकारने कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयी) आरोग्य विमा योजनेत नियोक्ता (संस्था किंवा कंपनी) आणि कर्मचार्‍यांचे एकूण काँट्रीब्युशन 6.5% वरून 4% पर्यंत कमी केले होते.

सरकारने केलेल्या या नव्या घोषणेनंतर नियोक्ता अर्थात कंपनीचे योगदान वाढून 3.25 टक्के झाले आहे. यापूर्वी नियोक्ताचे योगदान 4.75 टक्के होते. त्याचप्रमाणे कर्मचार्‍यांचे योगदान 1.75 टक्क्यांवरून 0.75 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या योजनेचा फायदा 3 कोटींहून अधिक लोकांना होतो. या सर्व लोकांना नवीन बदलांचा फायदा मिळणार आहे.