ESIC आणि EPFO मधील बदलावर शिक्कामोर्तब, नोकरी करणाऱ्यांना मिळणार 5 गिफ्ट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  मागच्या बुधवारी कामगार सुधारणेशी संबंधित तीन प्रमुख विधेयकास सभागृहाकडून मान्यता मिळाली आहे. या तिन्ही विधेयकात असंघटित क्षेत्रात काम करणार्‍यांना महत्वाच्या सुविधा दिल्या गेल्या आहेत. या अशा ३ सुविधांबाबत जाणून घेऊया..

ईएसआईसी का विस्तार

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) अंतर्गत जास्तीत जास्त संभाव्य कामगारांना आरोग्य संरक्षणाचा अधिकार देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ईएसआयसीची सुविधा आता सर्व ७४० जिल्ह्यात उपलब्ध करुन दिली जाईल. सध्या ही सुविधा केवळ ५६६ जिल्ह्यात दिली जात आहे.

रिस्की कामगार को तोहफा

या व्यतिरिक्त जोखीम असलेले कार्य करणार्‍या संस्था किंवा कंपन्याना देखील ईएसआयसीशी अनिवार्यपणे संबद्ध असतील, जरी त्यात एक कामगार असेल तरीही. ईएसआयसीचा सदस्य होण्याचा पर्याय १० पेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापनांना देखील दिला जात आहे.

ईपीएफओ की पहुंच का विस्तार 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) चे कव्हरेज २० कामगार असलेल्या सर्व आस्थापनांना लागू असेल. २० पेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापनांनाही ईपीएफओमध्ये सामील होण्याचा पर्याय दिला जात आहे.

 

रोजगार की मिलेगी जानकारी

रोजगार मिळवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रोजगाराची माहिती मिळवणे. या उद्दीष्टाने २० किंवा त्यापेक्षा अधिक कामगार असलेल्या सर्व आस्थापनांसाठी त्यांच्या आस्थापनांमध्ये रिक्त पदांची सूचना देणे बंधनकारक केले आहे. ही माहिती ऑनलाइन पोर्टलवर दिली जाईल.

 

निःशुल्क चिकित्सा जांच

कंपनीला वर्षातून एकदा निर्धारित वयापेक्षा जास्त कामगारांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक आहे. तसेच कामगारांना नियुक्तीपत्रे मिळवण्याचा कायदेशीर अधिकार दिला गेला आहे.