Modi Government | मोदी-शाह शिंदे गटावर खुश! मोदी सरकारने पहिल्यांदाच सोपवली महत्वाची जबाबदारी, दिल्लीत वजन वाढले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Modi Government | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) हे सध्या शिंदे गटावर (Shinde Group) खुश असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील भाजपाच्या (BJP) इतर अनुभवी खासदारांना डावलत मोदी सरकारने (Modi Government) शिंदे गटाकडे अतिशय महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. शिवसेनेला (Shivsena) खिंडार पाडण्याचे आणखी एक मोठे बक्षीस भाजपाकडून शिंदे गटाला देण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून नियुक्त करण्यात येणार्‍या अत्यंत महत्वाच्या अशा संसदेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव (MP Prataprao Jadhav) यांना देण्यात आली आहे.

 

मोदी सरकारने (Modi Government) पहिल्यांदाच एवढी मोठी जबाबदारी शिंदे गटाकडे सोपवली आहे. शिवसेनेत तीस वर्षांहून जास्त काळ असणारे प्रतापराव जाधव जुलैमध्ये शिंदे गटाते गेले. ते बुलडाणा जिल्ह्याचे मातब्बर नेते आहेत. विधानसभेत व लोकसभेत सलग तीन वेळा ते निवडून आले आहेत. 1989 पासून बुलढाणा जिल्ह्यात शिवसेना रुजिवण्यात त्यांची मोठी भूमिका होती.

 

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर जाधव यांनी तीन महिने तळ्यात-मळ्यात भूमिका घेतली. अखेर ‘मातोश्री’सोबतच्या 33 वर्षांच्या निष्ठेचे शिवबंधन तोडून ते शिंदे गटात गेले होते. त्यांचा मुलगा ऋषिकेश जाधव (Rishikesh Jadhav) याच्या राजकीय भविष्यासाठीच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे जिल्ह्यात बोलले जात आहे. आता नवीन जबाबदारी जाधव यांच्याकडे सोपवण्यात आल्याने त्यांचे शिंदे गटातील त्यांचे महत्त्व वाढले आहे.

कसे आहे स्थायी समितीच्या कामाचे स्वरूप…

अनेक महत्त्वाच्या, संवेदनशील वा तांत्रिक- शास्त्रीय- तंत्रज्ञानविषयक मुद्दय़ांवर वेळेअभावी सभागृहांमध्ये सखोल चर्चा होऊ शकत नाही. अशा वेळी विधेयक मंजूर करण्यापूर्वी स्थायी समितीत त्याचा विविधांगांनी विचार केला जाऊ शकतो.

मूळ विधेयकात दुरुस्ती सुचवली जाऊ शकते. स्थायी समितीच्या अहवालातील शिफारशींच्या आधारे विधेयकात बदल केले जाऊ शकतात. एखादे विधेयक मागेही घेतले जाऊ शकते.

सरकारी खर्चावर देखरेख करणे

कायद्याचा सखोल विचार करणे

मंत्रालयाशी निगडित धोरणांवर विषयवार चर्चा करणे व आढावा घेणे.

त्यासाठी गरज भासल्यास तज्ज्ञांचा सल्लाही घेणे.

स्थायी समित्या संसदेतील चर्चाचा अविभाज्य घटक असतात.
संसदीय कामकाजाचे कायदे आणि नियमांच्या अंतर्गत स्थायी समित्या कार्यान्वित होतात.
त्यांच्यावर केंद्र सरकारचे नियंत्रण नसते, उलट या समित्या केंद्राच्या धोरणांवर अंकुश ठेवत असतात.

वित्तीय, विषयवार आणि संसदीय कामकाजाशी निगडित अशा 3 प्रकारच्या स्थायी समित्या असतात.

 

Web Title :- Modi Government | 1 lakh 25 thousand workers gather at bkc ground for shindes dasara melava

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Registration and Stamp Duty Dept | तुकड्यातील जमिनींच्या दस्त नोंदणीबाबतचा अहवाल महसूल सचिवांकडे सादर

Nana Patole | ज्यांना स्वतःचा पक्ष नाही त्यांनी काँग्रेसवर बोलणे हास्यास्पद, नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना टोला

Kolhapur ACB Trap | 3 हजारांची लाच घेताना सहाय्यक लेखाधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात