Modi Government | सरकारी बँकेत अकाऊंट आहे? मग ‘या’ योजनेचा घ्या लाभ; दरमहा 28 रुपये जमा करून 4 लाख मिळणार, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Modi Government | केंद्र सरकारकडून अनेक वेगवेगळ्या योजना आणल्या जातात. मात्र अनेक नागरीकांना याची माहिती नसल्यानेे अनेकजन अशा लाभदायक योजनांपासून वंचित राहतात. ज्या नागरीकांचे सरकारी बँकेत (Govt. Banks) खाते आहे. अशा नागरीकांसाठी सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. यात दरमहा केवळ 28.5 रुपये जमा करून पूर्ण 4 लाख रुपयांचा लाभ घेऊ शकता. दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) नागरीकांच्या हितासाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आणल्या आहेत. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

4 लाख रुपयांची सुविधा –
चार लाख रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला सरकारच्या 2 योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागणार आहे. या योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आहेत. यामध्ये गुंतवणुकीची रक्कम खूप कमी आहे. यामध्ये केवळ 342 रुपये वार्षिक जमा करावे लागणार आहेत. दरम्यान, विशेष म्हणजे जन धन ग्राहकांना बँकेकडून ही सुविधा दिली जाते. बँक ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा संरक्षणाची सुविधा पुरवत आहे.

 

केवळ 330 रुपयांच्या वार्षिक हप्त्यावर इतका लाभ –
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी (PMJJBY) वार्षिक हफ्ता 330 रुपये आहे. याअंतर्गत व्यक्तीला जीवन विमा संरक्षण मिळते. विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये मिळतात. ही रक्कम तुमच्या बँक खात्यातून ECS च्या माध्यमातुन घेतली जाते.

काय आहे पीएम सुरक्षा विमा योजना?
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) अत्यंत कमी प्रीमियमवर विमा पुरवते.
ही योजना केंद्र सरकारची एक योजना आहे, ज्याअंतर्गत खातेधारकाला केवळ 12 रुपयांमध्ये 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.
हा एक अधिक फायदा खातेधारकाला होतो.

 

काय आहे अटल पेन्शन योजना?
कमी गुंतवणुकीवर पेन्शनच्या हमीसाठी सरकारने अटल पेन्शन योजना आणली आहे.
अटल पेन्शन योजनेअंतर्गत सरकार प्रति महीना 1 हजार ते 5 हजार रुपयांच्या पेन्शनची हमी देते.
सरकारच्या या योजनेमध्ये चाळीस वर्षांपर्यंतची व्यक्ती अर्ज करू शकणार आहे.

 

Web Title :- Modi Government | 4 lakh rupees benefits deposit only 28 rupees every month in any govt bank

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात काकानेच केले भाचीसोबत अश्लिल चाळे, विनयभंगाचा गुन्हा दाखल

Ananya Pandey Chat With Aryan Khan | आर्यन खानने अनन्या पांडेकडून मागवला होता गांजा? NCB सोर्सचा दावा, चॅटमध्ये लिहिले होते – ‘व्यवस्था करेन’

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 113 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी