Modi Government | मोदी सरकारचा महत्वपुर्ण निर्णय ! महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 700 कोटींची मदत जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात (Maharashtra) पावसाने थैमान घातलं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने जलप्रलय केला आहे. अनेक भागात पुरस्थिती (Flood) निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे (Farmers) अफाट नुकसान झाले आहे. या पार्श्वभुमीवर मोदी सरकारने (Modi Government) महाराष्ट्र राज्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर (Union Minister Narendra Singh Tomar) यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना आज (मंगळवारी) राज्यातील महाराष्ट्राला मदत जाहीर केली आहे. केंद्राने महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जवळजवळ 700 कोटी मंजूर (Modi Government) केले असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक नद्यां तुडुंब भरून वाहत आहेत.
राज्यातील अनेक भागात पूरस्थिती (Flood) निर्माण झाली होती.
याचा फटका हा राज्यातील शेतीला देखील बसला आहे.
पुराचे पाणी शेतात घुसल्याने प्रवाहाच्या वेगात ही पिके गेखील वाहून गेली आहेत
तर काही ठिकाणी पाणी साचून राहिल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यावरुन आता केंद्राने (Central Government) शेतकऱ्यांसाठी ही निर्णय घेतला आहे.

Web Titel :- Modi Government | 700 crore aid announced for flood hit farmers in maharashtra information of union agriculture minister in parliament

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharp Mind | ‘सुपर अ‍ॅक्टीव्ह’ मेंदूसाठी ‘या’ गोष्टी खा, स्मरणशक्ती मजबूत होईल; जाणून घ्या

Professor Vedkumar Vedalankar | मराठी सारस्वताचा मानबिंदू असणारी ‘ज्ञानेश्वरी’ आता हिंदी भाषेत अनुवादित होणार

Porn on Internet | 3000 रूपये भरा अन्यथा होईल अटक, पॉर्न पाहिल्याप्रकरणी बनावट नोटिसा पाठवून 1000 जणांना गंडवलं, केली 40 लाखाची कमाई