Modi Government Alert | मोदी सरकारचा अलर्ट ! कर्ज देणारी बनावट अ‍ॅप इन्स्टॉल करू नका आणि लिंक उघडू नका, काही क्षणात गायब होईल तुमची रक्कम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने (Modi Government Alert) लोकांना सावध केले आहे की, कर्जाच्या नावावर फसवणूक (Cheating) करणार्‍या प्लॅटफॉर्मपासून सावध रहा. गृह मंत्रालयाकडून (Home Ministry) चालवले जात असलेले जागरूकता ट्विटर हँडल सायबर दोस्तकडून याबाबत ट्विट करून माहिती देण्यात आली आहे (Modi Government Alert).

 

ट्विटमध्ये स्पष्ट म्हटले आहे की, बाजारातील कर्ज देणार्‍या बनावट अ‍ॅप्लीकेशन्सपासून (lending applications) सावध राहा. असे कोणतेही अ‍ॅप्लीकेशन पडताळणीशिवाय मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू नका आणि त्याच्या संबंधीत लिंक उघडू नका. सरकारकडून सांगण्यात आले आहे की, अशा सर्व कर्ज देणार्‍या कंपन्यांबाबत रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइटवर पडताळणी केली पाहिजे.

 

RBIच्या वेबसाइटवर सर्व कंपन्यांची माहिती असते. अशावेळी आवश्यक आहे की, कर्जासंबंधी कोणतेही कागदपत्र जमा करण्यापूर्वी पडताळणी करा. भोळ्या ग्राहकांना विविध प्रकारचे आमिष दाखवून फसवण्याचा (Fraud Case) प्रयत्न केला जातो. (Modi Government Alert)

कमी सिबिल स्कोअर (Low SibIl score) आणि स्वस्त व्याजदराचे अमिष
देशात अशी फसवणूक करणार्‍या अनेक संस्था आहेत. हे लोक कमी सिबिल आणि स्वस्त व्याजदराचे अमिष दाखवून लिंक पाठवतात आणि बनावट वेबसाइटवर कागदपत्र अपलोड करण्यास सांगतात. एकदा कागदपत्र अपलोड झाल्यानंतर त्यांचा चुकीचा वापर होण्याची शक्यता असते.

 

कर्ज देणारी सुमारे 600 अवैध अ‍ॅप (600 illegal lenders)
सरकारने याच आठवड्यात सोमवारी संसदेत सांगितले की, सध्या देशात 600च्या जवळपास अवैध कर्ज देणारी अ‍ॅप चालवली जात आहेत.
सरकारचा हा आकडा रिझर्व्ह बँकेच्या रिपोर्टवर आधारित आहे.
रिझर्व्ह बँकेने अगोदर सुद्धा अनेक कर्ज देणार्‍या अ‍ॅप्लीकेशन्सची नावे सार्वजनिक केली होती ज्यांच्यावर ग्राहकांची फसवणुकीचा आरोप आहे.

 

Web Title :- Modi Government Alert | modi government alert do not install fake lending apps or open links related to them all the earnings will disappear in a jiffy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुणे पोलिसांकडून राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक ! टीईटी पेपर फुटीसाठी मदत केल्याचा ठपका

Anti Corruption Bureau Thane | 50 हजार रुपयांच्या लाच प्रकरणी ‘उत्पादन शुल्क’मधील अधिकाऱ्यासह दोघे अँटी करप्शनच्या जाळ्यात

 

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 877 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

SCSS | पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना तुमच्यासाठी ठरू शकता लाभदायक ! केवळ पाच वर्षाच्या मॅच्युरिटीवर देईल 14 लाख रुपये; जाणून घ्या